शालेय जीवनातील अनुभवांचा उपयोग जीवन जगण्यासाठी होतो – गणेश हाके

शालेय जीवनातील अनुभवांचा उपयोग जीवन जगण्यासाठी होतो - गणेश हाके

पु. अहिल्यादेवी उच्च माध्य विद्यालयात स्नेह मेळावा, रक्तदान व वृक्षारोपन सोहळा संपन्न

अहमदपूर( गोविंद काळे ) ज्या शाळेत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जातो, केवळ साक्षर होण्यासाठी शिक्षण दिले जात नाही तर विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी, जीवन जगण्याचे कौशल्य कसे प्राप्त होतात याचे शिक्षण दिले जाते तीच शाळा उत्कृष्ट असते, आणि या सर्वांचा उपयोग जीवन जगण्यासाठी होतो असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी केले.

ते अहमदपुर तालुक्यातील सांगवी (सु.) येथील पु.अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या सन २००४-०५ वर्षाच्या तुकडीतील माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा, अर्थात ॠणानुबंध, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, अहमदपुर पंचायत समिती सभापती गंगासागर जाभाडे, जि.प. सदस्य माधव जाधव, जि.प. सदस्या मुद्रिकाताई भिकाणे, पंचायत समिती उपसभापती बालासाहेब गुट्टे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, युवा नेते कुलदीप हाके, शिवालिका हाके, भाजपाचे तालूका अध्यक्ष प्रा. हाणमंतराव देवकते, हरिश्चंद्र बलशेटवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्याम देवकते, सय्यद आरेफ, चंद्रकांत पाटील, माधव देवकते, माजी सैनिक अशोक कांडनगिरे, बालाजी हेमनर, दयानंद पाटील, डाॅ भालचंद्र ब्लड बॅंकेचे संक्रमण अधिकारी डाॅ. योगेश गावसाने, जनसंपर्क अधिकारी दिगांबर पवार व किशोर पवार, टेक्निशिअन जयप्रकाश सूर्यवंशी, अरूण कासले, बालाजी वेदपाठक, संजय ठाकूर, अन्सार शेख तसेच दै.पुढारीचे तालुका प्रतिनिधी नरसिंगराव सांगवीकर, दै.देशोन्नतीचे पत्रकार शरद कासले आदींची उपस्थिती होती.

ुढे बोलताना गणेश हाके म्हणाले की, सदरील शाळा ग्रामीण भागातील असून सुद्धा शहरी भागाच्या तोडीस तोड देत शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. लाॅकडाऊनच्या काळात सुद्धा शाळेतील शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करत राहिले, शिक्षणात खंड पडू दिला नाही याचा अभिमान वाटतो. तसेच समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी मनोगतात म्हटले की मीही ग्रामीण भागात शिक्षण घेतले असून या शाळेतील उपक्रमाबाबत मला हेवा वाटतो. एवढी सुंदर शाळा माझ्या बघण्यात क्वचितच प्रसंगी पहायला मिळाली. याप्रसंगी जि.प. सदस्य माधव जाधव, जि.प.सदस्या मुद्रिकाताई भिकाणे तसेच उपसभापती बालासाहेब गुट्टे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनीही आपल्या मनोगतातून आजी आणि माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तर शाळेचा माजी विद्यार्थी अशोक कांडनगिरे याने भारतीय सैन्य दलामध्ये सतरा वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दैवशाला शिंदे आणि शेख जिलानी यांनी केले तर आभार शेख जिलानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा संतोष मुळे, राजाराम बुर्ले, अमोल सारोळे, रमेश चेपूरे, अच्यूत सुरनर, संभाजी दुर्गे, कौशल्या देवकते, राजकुमार पनाळे, जनार्धन मासुळे, प्रदीप रेड्डी, चिंतन गिरी, मिनल गोगडे, गजानन फुलारी, गणेश जाधव, शेख हिदायत, विश्वंभर सुरनर, विवेकानंद सुरनर, अनंत उदगिरे, संजय कजेवाड, शिवदास देवकते आदीनी प्रयत्न केले.

चौकट :
सेन्हमेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्या तथा संस्था सचिव रेखाताई तरडे यांनी सांगितले की, या शाळेचे बरेच विद्यार्थी डाॅक्टर, इंजिनिअर, शिक्षक , अधिकारी झाले तर क्रीडा क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

About The Author