महर्षि पतंजली योग विद्यालय, शाखा अहमदपूर येथे सामूहिक १०८ सूर्यनमस्कारांचा कार्यक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : महर्षि पतंजली योग विद्यालय, शाखा अहमदपूर येथे सामूहिक १०८ सूर्यनमस्कारांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे संचालक श्री. सागर कुलकर्णी व संचालिका सौ.अंजली सागर कुलकर्णी यांनी केले होते. आयोजकांसह या कार्यक्रमात योगरत्न डाॕ. मेजर मधुसूदन चेरेकर; श्रीमती शिल्पा हंगरगे; सौ.दयावती हिंगरुपे, सौ.वृषाली अनिल चवळे, सौ,पुष्पा ठाकूर; श्री.सूर्यकांत मोरे, श्री.शंकर घाडगे; कुमारी शर्वरी शंकर घाडगे; श्री.शुभम् ठाकूर, श्री.प्रमोद वालेवाडीकर; महिला पतंजली योगसमितीच्या अध्यक्षा सौ.पुष्पा ठाकूर; श्री. धनञ्जय उजनकर, चि. अभिजीत धनञ्जय उजनकर यांनी सहभाग नोंदवला. अहमदपूर येथील योगाचे वरिष्ठतम आचार्य सौ कलावती व श्री. शिवमूर्ती भातांब्रे गुरुजी हेही कार्यक्रमास उपस्थित होते. १०८ सूर्यनमस्कारानंतर भातांब्रे गुरुजींनी योगनिद्रेचा अभ्यास घेतला.सर्वांनी अर्धा तास मंगल मैत्री साधनेचा अभ्यास केला. भातांब्रे गुरुजींनी सर्वांना प्रेमाशिर्वाद दिले व त्यांचे प्रसिद्ध चिंतन पत्रक प्रसाद म्हणून सर्वांना दिले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सौ.अंजली व श्री. सागर कुलकर्णी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यालयासाठी ह.भ.प.डाॕ. पांडुरंग कदम यांनी माॕडेल इंग्लिश स्कूलच्या चौथ्या मजल्यावर जागा दिली आहै त्याबद्दल सर्व योगसाधकांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.