नागझरी ग्रामपंचायतीत दिव्यांगाना साहित्याचे वाटप

नागझरी ग्रामपंचायतीत दिव्यांगाना साहित्याचे वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील ग्रामपंचायत नागझरी येथे सरपंच रामकिशन सुर्यवंशी व उपसरपंच उध्दव इप्पर यांच्या हस्ते दिव्यांगाना साहित्याचे वाटप करण्यात आले. सुदाम रंगनाथ इप्पर (व्हील चेर व एक काठी), वंदना दत्तराव इप्पर ( तीन व्हील सायकल) वाल्मिकी देविदास सुर्यवंशी (बॅटरी वरची ऑटोमॅटिक तीन व्हील स्कूटी) दिव्या गोपीनाथ इप्पर (एअर मशीन) यांना देण्यात आली. यावेळी गावातील नागनाथ इप्पर, बालाजी नागरगोजे, विठ्ठल इप्पर, तुकाराम इप्पर, संग्राम इप्पर, पांडुरंग इप्पर, गोपीनाथ इप्पर राहुल वाघमारे ई. उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!