शिवजयंती निमित्त आयोजीत मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानदीप अकॅडमीची विद्यार्थिनीचा तिसरा क्रमांक
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे शिवजयंती निमित्त आयोजीत केलेल्या 5 किमी मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात ज्ञानदीप अकॅडमीची विद्यार्थिनी सुजाता ताडवे हीने तृतीय क्रमांक पटकावला असुन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते मानचिन्ह व रु1500 देण्यात आले. यावेळी जि प. सदस्य माधव जाधव युवा नेते डॉ.सिद्धार्थ कुमार सुर्यवंशी, प्रा.मनोज रेड्डी, मुकेश पाटील, साईनाथ पाटील (सर्व शिवजयंती महोत्सव समिती) व ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक उध्दव इप्पर ई. उपस्थित होते.