विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेत ‘दयानंद वाणिज्य’ चा दबदबा

विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेत 'दयानंद वाणिज्य' चा दबदबा

गुणवत्ता यादीत पहिले तीनही विद्यार्थी
दयानंद वाणिज्यचेच

लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने घेण्यात आलेल्या “उन्हाळी-2020″च्या विद्यापीठ पदव्युत्तर एम.कॉम. वाणिज्य शाखेतील परीक्षेत येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत विद्यापीठातून प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान याच महाविद्यालयाने मिळविला आहे.
सरस्वती तुकाराम जोशी 86.56 टक्के गुण घेऊन विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम आली आहे. शैलजा पांडुरंग चिकट्टे 84.94 टक्के गुण घेऊन द्वितीय तर स्वाती नरसिंग मोरे 83.75 टक्के गुण घेऊन विद्यापीठात तृतीय आली आहे. या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रोख 10 हजार रुपये, 7 हजार रुपये आणि 5 हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी गुण गौरव सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी होते. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेशकुमारजी राठी, सचिव रमेशजी बियाणी, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ.राजाराम पवार, डॉ.शशिकांत स्वामी डॉ.वैशाली सातपुते आदींची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रिडा व सांस्कृतिक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोविड-19 च्या प्रादुर्भावातही दयानंद शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण गुणवत्ता वाढीसाठी ज्या-ज्या सुख-सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. विशाल वर्मा यांनी मानले. सदरील कार्यक्रमास क्रिडा प्रमुख डॉ. नितेश स्वामी, डॉ .बाळासाहेब चव्हाण, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे, कार्यालयीन अधीक्षक श्री कातपुरे आदी प्राध्यापक, पालक व प्रशासकीय कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author