गॅस दरवाढीच्या विरोधात महिला काँग्रेसचे धरणे आंदोलन
लातूरात महिला काँग्रेसच्या वतीने चुलीवर स्वयंपाक करत केला केंद्र सरकारचा निषेध
लातूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या तुभलकी मनमानी कारभारामुळे नागरिकांचा हाल झाले असून जीवनावश्यक वस्तू गॅस,पेट्रोल, डिझेल चे भाव गगणाला भिडले असून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना वेळ नाही नुसत्या घोषणा देवुन वेळ काढून नेण्याचा प्रयत्न सरकार करीत असून केंद्रातील सरकार च्या धोरणाच्या निषेधार्थ लातूर महिला जिल्हा काँग्रेस च्या वतीने लातूरच्या महात्मा गांधी चौकात शुक्रवारी मोदी सरकार चले जावो च्या घोषणा देत चुलीवर भाकरी करून गोरगरीब जनतेचे काय हाल होत आहे हे झोपीचा सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला दाखवण्यासाठी आंदोलन व निर्दशने लातूर महिला जिल्हा काँग्रेस च्या अध्यक्षा सुनीता आरळीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत महिला काँग्रेसच्या पदाधिकारी चक्क यांनी गॅस सिलिंडर, पोळीपाठ, लाटणे, भाजीपाला, चूल आणून मोदी सरकार चा निषेध केला आहे झोपलेल्या मोदी सरकार ला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी धरणे आंदोलणात जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष सौ सुनीता आरळीकर, निलंग्याच्या माजी नगराध्यक्षा सुनीताताई चोपने, सुरेखा गायकवाड, स्वयंप्रभाताई पाटील,कमलाताई मिटकरी मिनाताई टेकाळे, संगीता जोगदंड, लक्ष्मीबाई बटनपूरकर, दैवशाला राजमाने, सुलेखा कारेपूरकर, नैना इरबतनवाड, संगीता पतंगे, मुलानी आबेदाबी, मिनाक्षी शेटे, सिमा क्षीरसागर, सविता पवार आदी कांग्रेस च्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.
मोदी सरकार जागे व्हा – सुनीता आरळीकर
यावेळी बोलताना महिला कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षा आरळीकर ताई म्हणाल्या की, मोदी सरकारने केलेल्या भरमसाठ गॅस, इंधन दरवाढी तात्काळ मागे घेण्यात यावे झोपलेल्या मोदी सरकारने जागे व्हावे अशी मागणी सौ आरळीकर यांनी करत यापुढे तमाम गोरगरीब महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे.