समाजातील अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे कार्य उदयगिरी लॉयन्स नेत्ररूग्नालय उदगीर करत आहे – आ.संभाजी पाटील निलंगेकर
उदगीर (एल.पी.उगीले) : मानवी शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा, डोळ्याची नजर अबाधित राहावी. आणि सध्याच्या या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये. म्हणून आपण काळजी घ्यावी. तरिही सतत लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होत असलेले व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आपण नेत्रतज्ञाकडुन सल्ला ऐकत आहोत.
समाजातील दृष्टी कमजोर,अंध व्यक्तींना दृष्ट्री देण्याचे सामाजीक कार्य डाॅ.रामप्रसाद लखोटीया यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर येथील नेत्रमंदीरात होत आहे, असे माजी पालकमंत्री आ.संभाजी निलंगेकर यांनी अक्का फाउंडेशन मार्फत उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालयील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.रामप्रसाद लखोटीया हे होते, तर मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवर आ.संभाजी पाटील निलंगेकर, माजी जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगरउपाध्यक्ष सुधीर भौसले,शिवानंद हैबतपुरे,सुरेश देबडवार,अजय मलगे,डाॅ.अपुर्वा तोष्णीवाल,डाॅ.सुदाम बिरादार,डाॅ. दिपाली पाटील,प्रा.पंडीत सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्का फाउंडेशन च्या वतीने उपस्थित सर्व डाॅक्टर व कर्मचारी यांचा सत्कार आ. संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्याचे स्वागत ही नेत्रमंदीराच्या वतिने करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात डाॅ.रामप्रसाद लखोटिया बोलताना म्हणाले, निलंगा तालुक्यातील मतदारसंघात गोर गरीब जनतेतील, समाजातील सामान्य नागरीकांची पैशा अभावी किंवा अन्य कारणानी गेलेली दृष्ट्री परत आण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त अंधत्व मुक्त गाव,मोतिबिंदू मुक्त मतदार संघ करण्यासाठी निलंगा,देवणी,शिरूर अनंतपाळ,या मतदार संघातील अक्का फाउंडेशन मार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया राबवीत आहेत. यांचे हे सामाजि कार्याचे सर्वांना दिशा देणारे आहे.
मागील एक महिन्यात 1,000 पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर 3,000 चष्मे वाटप झाले आहेत.30 गावात शिबीरे घेऊन 20000 पेक्षा जास्त लोकांची नेत्रतपासनी करण्यांत आली आहे. असे सांगितले. आ.निलंगेकर यांनी पुढे हे कार्य चालुच राहावे असे ही सांगितले आणि त्यांनी आज पर्यंत झालेल्या कार्याचे कौतुक, अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या.
यावैळी उपस्थित शिबीर प्रमुख राम शेरे,संजय पाटील,तानाजी हजारे,गणेश मुंडे,रवि जवळे,फयाज फारूखी,विष्णू पवार,गणेश जोगदंड,जावेद,यांच्यासह रूग्णालयातील सर्व कर्मचारी व पेंशन्ट उपस्थित होते.