अखेर पीएसआय क्षीरसागर यांची उचलबांगडी?
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील बहुचर्चित झालेले एसपी साहेबाच्या विशेष पथकातील पीएसआय क्षीरसागर आपल्या मनमानीने गाजले होते. हरंगुळच नव्हेतर पंचक्रोशीतील एक नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या श्याम भाऊ बरुरे यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून अश्लील शब्द वापरून अपमानीत केले, इतकेच नाही तर त्यांच्या गाडीला चौदाशे रुपये दंड लावल्यानंतर ही पोलीस स्टेशनच्या एका खोलीत डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात स्थानिक पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही कृती चुकीची असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र मी एस पी साहेबांच्या विशेष पथकातील अधिकारी असल्यामुळे तुम्ही कोणीही मध्ये बोलू नका. असा दम दिला आणि या प्रकरणात मनमानी करून श्याम भाऊ बरुरे यांचा अपमान केला. यासंदर्भात लातूर पंचक्रोशीतील शेकडो तरुणांनी पीएसआय क्षिरसागर यांच्या या कृतीचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात पोलीस फ्लॅश न्यूज आणि पोलीस संदेश रिपोर्टर या आमच्या वृत्त समूहाने श्याम भाऊ बरुरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन क्षीरसागर यांच्या मनमानी वागण्याचा आणि एसपी साहेबांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याच्याविरोधात अत्यंत निर्भीडपणे लिखाण केले होते. याची दखल घेऊन क्षीरसागर यांची विशेष पथकातून उचलबांगडी केल्याची विश्वासनीय बातमी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेबांनी श्याम भाऊ बरुरे यांना न्याय देत मगरुर क्षीरसागर यांना पथकातून हकालपट्टी केल्याबद्दल जन सामान्यातून एसपी साहेबांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
भगवानके घरमे देर है लेकिन अंधेर नही म्हणतात ते हेच!