डी वाय एस पी च्या विशेष पथकाची विशेष कामगिरी; पिस्तुल सह दुचाकी जप्त 

डी वाय एस पी च्या विशेष पथकाची विशेष कामगिरी; पिस्तुल सह दुचाकी जप्त 

लातूर (कैलास साळुंके) : लातूर शहरात सध्या गावठी बनावटीच्या कट्टा अर्थात पिस्टल विक्रीचा धंदा तेजीत आला आहे. परवाच मध्यप्रदेशातून केवळ दहा हजारात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे घेऊन आल्याची खबर लागताच पंकज शामसुंदर पारीख या सत्तावीस वर्ष वयाच्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे केवळ कार्ड दुरुस्ती आणि एक रिकामी केस सापडली. त्याने त्याच्या इतर मित्रासोबत चार महिन्यापूर्वी सेंधवा मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसे केवळ दहा हजार रुपयात आणल्याची माहिती दिली. त्याने पिस्तूल समाधान वसंत कांबळे रा. वासनगाव ता. लातूर यांच्याकडे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ समाधान कांबळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या घटनेची चर्चा संपते न संपते तोच डी वाय एस पी च्या विशेष पथकाने पून्हा दोन व्यक्ती आणि एक पिस्तूल जप्त केले आहे. तसेच पिस्तुल घेऊन ज्या गाडीवरून ते फिरत होते, ती गाडीही जप्त करण्यात आली आहे. या संदर्भात डीवायएसपी च्या विशेष पथकाकडून हाती आलेली माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र ढगे,  ए एस आय वाहिद शेख, पो ना बिलापट्टे,, पारडे, सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल खडके हे डीवायएसपी च्या विशेष पथकात असून शहरांमध्ये चालत असलेल्या गैर कायदेशिर कामाची माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की, लातूर शहरातील कातपुर रोड मुन्ना टी हाऊसचे मागे हाज्जु नगर लातूर येथे दोन इसम एक्सेस स्कुटी क्रमांक एम एच 24 बीएफ 10 69 वर बसलेले असून त्यांच्याजवळ पिस्तूल असल्याचे समजले.

 वरिष्ठांच्या आदेशाने या पथकाने लगेच मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी गेले असता, तेथे दोन व्यक्ती दिसून आले. त्यांची नावे विचारली असता एकाचे नाव विश्वजीत अभिमनु देवकते (वीस वर्ष) रा. कातपुर तालुका जिल्हा लातूर तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव यशोधन केशराव कातळे (19 वर्ष) राहणार गरसुळी तालुका रेणापूर जिल्हा लातूर हाल मुक्काम शिवाजी नगर लातूर असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता विश्वजीत देवकते त्याच्याजवळून कमरेला डाव्या बाजूस पॅण्टमध्ये एक देशी बनावटीचा पिस्तुल ठेवलेला मिळून आला. सदरील गावठी कट्टा कोठून आणला? याबाबत विचारणा केली असता, त्यांनी मी व माझा मित्र यशोधन केशव कातळे असे दोघांनी पंकज पारीक यांचेकडून सदरील खट्टा घेतल्याचे कळवले. त्यांच्या जवळून एक सिल्वर रंगाच्या धातूचा पिस्तूल अर्थात गावठी कट्टा जप्त करण्यात आला. त्याची किंमत अंदाजे 40 हजार रुपये आहे. तसेच एक सुझुकी कंपनीची ॲक्सेस ग्रे कलरची स्कुटी त्याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज या विशेष पथकाने जप्त करून विश्वजीत देवकते आणि यशोधन कातळे या दोघांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यासंदर्भात रामचंद्र ढगे यांनी रितसर फिर्याद दिली आहे. या अनुषंगाने विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा नोंद याची प्रक्रिया चालू होती.

About The Author