पद, प्रतिष्ठेपेक्षा श्रमावर निष्ठा ठेवून पाटील यांनी संस्थेचे काम केले – निळकंठराव पवार
सेवानिवृत्तीबद्दल प्रयोगशाळा सहायक युध्दवीर पाटील यांचा सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : पाटील यांच्यारूपाने जेएसपीएम संस्थेला श्रमावर निष्ठा असणारा माणूस मिळाला. त्यांनी पद, प्रतिष्ठेपेक्षा श्रमाला प्राधान्य देवून आपल्या 35 वर्षाच्या कालावधीत शेवटच्या क्षणापर्यंत काम केले. विद्यालयाच्या वाटचालीत प्राचार्य शिंदे, पाटील, परिहार यांनी खुप मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे या विद्यालयाचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. त्यामुळे कार्यालयातील प्रत्येक कर्मचार्यांनी पद, प्रतिष्ठेपेक्षा श्रमावर निष्ठा ठेवून पाटील सरांसारखे काम करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्रात विद्यालयात सेवानिवृतीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जेएसपीएमचे शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांचे स्वीय सहायक कमलाकर कदम, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राथमिकचे मुख्याध्यापक संजय बिराजदार,डॉ.उत्कर्षा पाटील, डी.एन.केंद्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मजगे नगर येथील प्रयोगशाळा सहायक युध्दवीर वामनराव पाटील यांची 35 वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली असून जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार डी. एन. केंद्रे, गौंडगावे, रेड्डी, परीहार, चेवले, भार्गव पाटील आदींच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालीब शेख यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.