आजचा चांगला वाचक हाच उद्याचा सर्जक असतो – अनिता यलमटे

आजचा चांगला वाचक हाच उद्याचा सर्जक असतो - अनिता यलमटे

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.कलाम यांच्या जन्मदिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रतिमापूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी ,प्रमुख वक्त्या अनिता यलमटे ,पर्यवेक्षक माधव मठवाले,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, विनायक इंगळे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी विषयमांडणी करताना अनिता यलमटे यांनी पुस्तके माणसाच्या व्यक्तीमत्वाला आकार देत जीवन कसे घडवतात याची अनेक उदाहरणे देत वाचनसंस्कृतीचे महत्त्व पटवून दिले.”वाचन हा मानवनिर्मित अमृतकलश आहे. हा अमृतकलश आम्हाला अमरत्व तर देतोच, शिवाय आमच्या साऱ्या संवेदनाही जिवंत ठेवतो”,असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपात अंबादास गायकवाड यांनी अन्य ,वस्त्र ,निवार्यासोबत ‘वाचन’ चौथी मूलभूत गरज असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले.
तसेच ‘आंतरराष्ट्रीय हात धुवा’ दिनानिमित्त आदर्श हात धुण्याचे प्रात्यक्षिक कृतीगीताच्या आधारे सौ.प्रिती शेंडे यांनी करून दाखवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ राऊत ,प्रास्ताविक केदार वाघमारे ,स्वागत परिचय अनिता मूळखेडे यांनी केले तर उपस्थितांचे ऋणनिर्देश ज्योती घोडके यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने किरण नेमट यांनी केली.

About The Author

error: Content is protected !!