भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर तालुक्यातील एकुर्गा जिल्हा परिषद गटातील मौजे बोपला येथील काँग्रेस पक्षाचे धडाडीचे युवा कार्यकर्ते रोहित पाटील व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
विकास पुरुष देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कामावर प्रेरित होऊन रोहित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने बोपला आणि त्या परिसरात काँग्रेसची ताकद कमजोर झाली आहे. याप्रसंगी भाजयुमोचे तालुका अध्यक्ष अँड धनराज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर जुगल, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, बालाजी गवळी, शंकर चव्हाण, रवी भैया मगर उपस्थित होते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात रोहित पाटील यांच्यासह संतोष मगर ,ऋषी काटे, अनिल मिरजे, संभाजी मगर ,गणेश मगर ,सुदीप पाटील, सुरज मगर ,विकास पुदाले ,लखन चव्हाण, श्रीकांत मगर ,अमोल मगर, अमर इंगळे, दीपक गोरडे ,कृष्णा काटे ,श्याम कुंभार, आबासाहेब घुले ,सुनील पाटील, शुभम पाटील ,अक्षय गायकवाड, आकाश पाटील यांनी जाहीर प्रवेश केला.
