अवैध होर्डिंग व बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रोपीकरण करणाऱ्यावर लातूर महानगरपालिका व पोलिसांची कारवाई.. होर्डिंग,बोर्ड जप्त. सात गुन्हे दाखल.
लातूर (एल.पी.उगीले) : याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, उच्च न्यायालयाने अवैध होर्डिग लावण्या संदर्भात मनाई केली असतानाही काही इसमाकडून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता शहरात ठिकठिकाणी सर्रास अवैध होर्डिंग, बॅनर व पोस्टर लावले जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात लातूर शहरातील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच लातूर महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली 2 दिवसापासून विशेष मोहीम राबवून विविध विषयांचे विनापरवाना,अवैधरीत्या बॅनर,होर्डिंग लावून शहराच्या सार्वजनिक विद्रूपीकरणास कारणीभूत ठरलेल्या व अवैधरित्या होर्डिंग बॅनर लावणाऱ्यावर लातूर शहरातील पोलीस ठाणे एमआयडीसी, शिवाजीनगर व विवेकानंद चौक येथे महाराष्ट्र सार्वजनिक संपत्ती विद्रूपिकरण कायदा 1995 अन्वये एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
महापालिकेच्या झोनच्या पथकाने अवैध होर्डिग जप्त केल्यानंतर संबंधितावर दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध होर्डिंग, बॅनर हटिवण्याची कारवाई यापुढेही नियमित सुरु राहणार असून रात्रीच्या सुमारास होर्डिंग लावले जाते.याबाबतची सूचना मिळताच अवैध होर्डिंग व पोस्टर जप्त करून अवैध होर्डिंग लावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.दोषींच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
