इनरव्हील क्लब उदगीर तर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त मोफत पुस्तक वाटप

इनरव्हील क्लब उदगीर तर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त मोफत पुस्तक वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : भारताचे पुर्व राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ एन.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते.अब्दुल कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांना उच्च ध्येय व मोठी स्वप्ने बघण्यासाठी प्रेरित करतात.
लहान मूले भारताचे भविष्य आहेत, त्यांनी खूप वाचन केले पाहिजे, ज्ञान मिळवले पाहिजे. हा त्यांचा सदैव उद्देश होता. या दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब उदगीर द्वारा श्रीमती लक्ष्मीबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उदगीर येथील ५ ते १० च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पुस्तके व गाईडचे व इतर शालेय वस्तू आणि पौष्टिक बिस्कीट याचे वाटप करण्यात आले.या प्रोजेक्ट साठी प्रमुख होत्या, सौ. वर्षा कणसे.
यावेळी जागतिक हात धुवा दिनानिमित्त इनरव्हील क्लब सदस्य प्रिती दुरुगकर यांनी हात स्वच्छ धुवावेत व स्वच्छता राखावी. यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्रीमती लक्ष्मीबाई शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा ठाकूर, सहशिक्षक कणजे ए.ए‌., क्षीरसागर एम.डी.,जनवाडे,बी.जे., सुरवसे एस,फुले एम. याचबरोबर इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ. स्वाती गुरुडे, सचिव सौ. शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार, एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार, आय एस ओ सौ. स्नेहलता चणगे, सदस्य पल्लवी कुलकर्णी, नेहा जैन, प्रिया नरखेडे,प्रिती दुरुगकर,सविता कोरे यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!