आव्होपा संचलित बालवाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : देशाचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त AVOPA संचलित नगरेश्वर मंदिर येथील बालवाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्यवैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन उदगीरचे संस्थापक अध्यक्ष तथा लेखक डॉ. दीपक चिद्दरवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द बालसाहित्यिक शंकर बोईनवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर प्रा.डॉ. दीपक चिद्दरवार यांनी डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर बालवाचकाना सविस्तर मार्गदर्शन केले. तर शंकर बोईनवाड यांनी बालवाचकाना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी बाल वाचनालयाच्या वतीने शंकर बोईनवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन असोसिएशनचे कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार यांनी केले.तर वाचनालय व्यवस्थापन समिती प्रमुख संजय पतेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास संतोष कोडगिरे, नंदकिशोर कलकोटे व बालवाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
