इनरव्हील क्लब उदगीर तर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत दात तपासणी शिबिर

इनरव्हील क्लब उदगीर तर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत दात तपासणी शिबिर

उदगीर (एल.पी.उगीले) : आरोग्य धनसंपदा हे लहान मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. लहान वयातील मुलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.काही कारणांमुळे निष्काळजीपणामुळे लहान मुलांच्या दातांचे आरोग्य बिघडत आहे. हे लक्षात घेऊन उदगीर इनरव्हील तर्फे लहान मुलांच्या दातांच्या समस्या जाणण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निडेबन येथे मोफत दंत रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये डेंटिस्ट इनरव्हील क्लब उदगीर सदस्या डॉ शीतल राम पाटील व डॉ सुशील चंबुले यांनी मुलांच्या दातांची तपासणी केली. व योग्य ती काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
दातांच्या समस्या वर उपाय सांगितले. या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी पतंजली दंतकांती पेस्ट व सफरचंदाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ. स्वाती गुरुडे, सचिव सौ. शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार, एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार, सदस्य सौ. प्रिया नरखेडे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निडेबनच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील मीनाताई शंकरराव, सहशिक्षक केंद्रे एम.एस,चोले जे.एम, अंकुशे एम.एस यांची उपस्थिती होती. डॉ शीतल पाटील व डॉ सुशील चंबुले यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

About The Author

error: Content is protected !!