महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अकरावी व बारावी नीट, जेईई विशेष वर्गाचा पालक मेळावा संपन्न झाला.अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके होते, मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे , प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य सी.एम.भद्रे, पर्यवेक्षक प्रा.जे.आर.कांदे, प्रा.ए.के.मिश्रा, प्रा.यादव, प्रा.सिना, प्रा.संजीवकुमार यांची उपस्थिती होती. पालकांच्या वतीने अभिजीत गायकवाड, भानुदास राठोड, संघशक्ती बलांडे, मकबूल अलीम शेख, प्रभाकर सूर्यवंशी यांनी या वर्गाबद्दलची मते व्यक्त केली. यावेळी प्रा.मिश्रा म्हणाले नीट व जेईई परीक्षा साधना आहे, त्यात विद्यार्थ्यांना खूप तयारी करावी लागते महाविद्यालयाकडून पालकांच्या विश्वास जपला जाईल. यावेळी तोंडारे म्हणाले पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीच्या बाबतीत नि:संकोच महाविद्यालयाशी संपर्क ठेवावा. समारोपात तिरुके म्हणाले या वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होत असून पालकांनी दिलेल्या सूचनांचे स्वागत आहे. सूत्रसंचालन प्रा.प्रसाद जालनापुरकर यांनी केले तर आभार प्रा.विलास काकनाळे यांनी मानले.
