उदयगिरी कापड मार्केट आणि आडत लाइन परिसराचा विकास सुरू – डॉ. तेलगाणे
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेले आणि बाजारपेठेने प्रसिद्ध असलेले उदयगिरी कापड मार्केट, उदगीर आडत लाईन हा परिसर महत्त्वाचा असून देखील गेल्या कित्येक दिवसापासून विकासापासून उपेक्षित राहिला होता. यासंदर्भात वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी करून देखील विकास कामाला गती मिळत नव्हती.
मात्र आता या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा उदगीरचे प्रसिद्ध डॉक्टर, प्रबोधनकार, कीर्तनकार शरदकुमार तेलगाने यांनी दिली आहे. या विकास कामासाठी उदगीरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, सुप्रसिद्ध विधीज्ञ अंकुलगे, रामविलास नावंदर, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगरसेवक विधीज्ञ दत्ता पाटील, भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संतोष बडगे, गजानन चीद्रेवार, अमर शेठ खत्री, चंद्रशेखर पुणे, श्रीनिवास पेन्सलवार, सतीश रंगदळ, निवृत्ती जाधव इत्यादी मान्यवर या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
या निमित्ताने उपेक्षित राहिलेल्या भागाच्या विकास काम गतीने होईल, अशी खात्रीही डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केली आहे.