तालुका जि प शिक्षक पतसंस्थेच्या वतीने 800 सभासदांना दीपावली विशेष अग्रीम योजनेचा लाभ
उदगीर ( एल. पी. उगीले) : उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सत्तेत आल्यापासून सतत सभासदांच्या हिताचे वेगवेगळे निर्णय घेऊन पतसंस्थेचा आणि शिक्षकांचा फायदा पाहिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळी सण उत्सवाच्या निमित्ताने शिक्षक बांधवांना अर्थसाह्य योजनेअंतर्गत केवळ पाचशे रुपये मात्र व्याजदरावर दिवाळी सण अग्रीम योजना सुरू केली आहे. या योजनेचा जवळपास 800 शिक्षक बांधवांनी लाभ घेतला.
लातूर जिल्ह्यातील एक अग्रणी पतसंस्था म्हणून या पतसंस्थेचा उल्लेख केला जातो. पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी राबवलेले उल्लेखनीय उपक्रम आणि विश्वासार्हतेवर मिळवलेल्या ठेवी यामुळे लवकरच या पतसंस्थेला बँकेचा दर्जा मिळेल, अशी अपेक्षाही सभासदांना वाटू लागली आहे.
उदगीर, देवणी आणि जळकोट या तीन तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या या पतसंस्थेतील सभासदांची बँक खाते ही वेगवेगल्या बँकेत आहेत, असे असतानाही सर्व सभासद बांधवांच्या खात्यावर लाभांश व सन अग्रीम जमा करण्यात आले आहे.
त्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे. या पतसंस्थेच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश वाटप आणि सण अग्रीम वाटप यासारखे सर्व कामे एकाच वेळी आल्यामुळे प्रशासनावर थोडा ताण आला असला तरीही, सुयोग्य नियोजन केल्यामुळे योग्य पद्धतीने वेळेत पूर्ण कामे करून पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत कांबळे आणि पतसंस्थेचे सचिव सर्जेराव भांगे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार काळे व सर्व संचालक मंडळांचे अभिनंदन केले जात असल्याची माहिती रविकिरण बलुले यांनी दिली आहे.