अतनूर येथे स्वस्त धान्य दुकानातून दिवाळीचे रेशन कीट वाटप
अतनूर (एल.पी.उगीले): अनुराधा येथे राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार गावातील रेशन शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांना शंभर रूपयांमध्ये गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने रेशन दुकानाच्या माध्यमातून एक किलो डाळ, एक किलो साखर, एक लिटर पामआॕईल तेल, एक किलो रवा, हे चार जिनस शंभर रूपयात एक कीट देण्यात येत आहे. यानुसार दिवाळी रेशनकिट वाटप करण्याची जाहीर केले. त्यानुसार येथील स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून वाटपाला आजरोजी जळकोट तहसीलच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजा खरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी व पुरवठा विभागातील कर्मचारी कोंडिबा गवळी यांच्या देखरेखेखाली व सुचनेनुसार प्रारंभ झाला. यावेळी स्वस्त धान्य दुकान क्रमांक-१ चे मालक तथा माजी सैनिक शिवाजीराव नारायण कदम, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, माधव सासट्टे, मधूकर गव्हाणे, बालाजी जाधव, राहुल गायकवाड, नागनाथ सासट्टे, श्रीरू बारसुळे, विकास वाघमारे, चंदर गायकवाड, सुर्यकांत येवरे, गुरूनाथ कापसे, राम भोई, सुंदरबाई तानाजी शिकलवाड उपस्थित होते.