इनरव्हील क्लब व किडझी स्कूल उदगीर यांनी बेघर निवारा केंद्र व स्थलांतरित लोकांसोबत साजरी केली दिवाळी
उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लब उदगीर व किडझी स्कूल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभिमान अंतर्गत”आधार”बेघर निवारा केंद्र, उदगीर येथे व स्थलांतरित लोकांना दिवाळी फराळ, किराणा किट,फुड पॅकेट, दिवाळी अभ्यंग स्नानासाठी लागणारे तेल,साबण याचबरोबर पोष्टीक बिस्कीट याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी किडझी स्कूल उदगीरचे प्राचार्या स्वाती गुरुडे व किडझी स्कूलचे पालक हे प्रोजेक्ट प्रमुख होते.किडझी स्कूलच्या शिक्षिका राजनंदिनी ज्ञानोबा कोटलवार यांनी आपला वाढदिवस केक कापून साजरा न करता ४० किराणा किटचे वाटप करून केला हे कौतुकास्पद आहे.
या उपक्रमासाठी किडझी स्कूलचे संस्थाचालक मनोज गुरुडे, पत्रकार बिभीषण मद्देवाड व आधार बेघर निवारा केंद्रातील कर्मचारी शेख समीर,शेख जमील यांनी विशेष सहकार्य केले.किडझी स्कूलच्या सर्व शिक्षकवृंदानी विशेष परिश्रम घेतले.या वेळी इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ स्वाती गुरुडे, सचिव सौ शिल्पा बंडे, सहसचिव अॅड सौ निलिमा पारसेवार, एडिटर सौ पल्लवी मुक्कावार आय एस ओ सौ स्नेहलता चणगे, क्लब सी सी प्रा सौ अश्विनी देशमुख व सदस्य सौ शिल्पा संगेकर,नेहा जैन यांची उपस्थिती होती.