दुकान दुसऱ्याला दिल्याशिवाय धान्य घेणार नाही म्हणुन दिवाळीचा किट व धान्यावर घातला अडोळवाडी च्या महिला व पुरुषांनी बहिष्कार!
वाढवणा (हुकूमत शेख) : पासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगीर तालुक्यातील अडोळवाडी येथील रास्तभाव दुकान महिला बचत गटाला मिळाली असुन गावात एकुण 57 शिधाधारक आहेत. त्या शिधाधारकांना महिला दुकानदार वेळेवर धान्य आणत नाहीत, आणल्यावर फक्त एक दिवसात धान्य घेउन जा, नाही तर मिळणार नाही. अशी धमकी देतात , युनिट प्रमाणे धान्य देत नाहीत, नियमानुसार पावती देत नाहीत, धान्याचे पैसे जास्त घेतात असा तक्रारीचा पाडाच अडोळवाडी गावातील अनेक शिधाधारकांनी आमचे प्रतिनिधी हुकूमत शेख यांना वाचून दाखवला. आम्हाला ही दुकानदार महिला धान्य देतच नाहीत, दिले तरी युनिट प्रमाणे देत नाहीत, उरलेला धान्य काळ्या बाजारात सर्रास विक्री होते,असा आरोप असल्याने दुकानदाराची चौकशी करावी. व कार्यवाही करून दोषी अढळल्यास कार्यवाही करावी. म्हणुन रीतसर उदगीर तहसील पुरवठा विभाग व जिल्हाधिकारी कार्यलय लातुर येथे दि.6 सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी रीतसर अर्ज दिले होते. मात्र आजतागायत दुकानदारावर कसलीच कार्यवाही नाही की साधी चौकशी देखील झाली नसल्यामुळे अडोळवाडीच्या ग्रामस्थांनी ऐन सणासुदीला आलेला धान्य न घेता, संपूर्ण शिधाधारकांनी बहिष्कार घातला आहे. जो पर्यंत चौकशी करून दुकान गावातील दुसऱ्या व्यक्तीला किंवा महिलांना दिले जात नाही, तो पर्यंत आम्ही धान्य घेणार नाही. चौकशी नाही झाली, दुकान दुसऱ्याला दिली नाही तर आम्ही थोडया दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुर्ण शिधाधारक महिला, पुरुष अमरण उपोषण करण्याची माहिती आमचे प्रतिनिधी हुकूमत शेख यांच्याशी वार्तालाप करताना सर्वांनी एकमुखी मागणी केली.
संबंधित विभाग जातीने लक्ष घालुन दुकानदाराची कसून चौकशी करून दोषी आढळल्यास कार्यवाही करून दुकान दुसऱ्या व्यक्तीस देण्याची एकमुखी मागणी ग्रामस्थानी केली असुन लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून अडोळवाडीकराना न्याय मिळवून देण्याची मागणी होताना दिसत आहे.