महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी कुणाल बागबंदे
उदगीर (एल. पी. उगीले) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील युवक आघाडीच्या कर्तबगार आणि संघटन कुशल तरुणांना प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी व्यूह रचना आखण्यात आली आहे.
या क्रियाशी ल कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये उदगीर येथील तरुण कार्यकर्ते कुणाल किरण बागबंदे यांचा समावेश करण्यात आला असून तसे अधिकृत पत्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी प्रदीप शिधवा, माधव सिंह, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रभारी प्रतिमा मुदगल, वंदना बैन इत्यादी मान्यवरांनी स्वाक्षरी करून दिले आहे.
सदरील नियुक्ती पत्रामध्ये प्राधान्याने सचिव आणि सहसचिव यांच्या निवडी केल्या असून युवक काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये सहभागी झालेल्या या तरुणांनी आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पक्षाची ध्येयधोरणे आणि सर्वधर्मसमभावाची भावना यासोबतच एक संघपणे काँग्रेसचे नेते सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अलवारू राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी या कार्यकारिणीकडून अपेक्षा व्यक्त करून आपल्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त ताकतीने प्रत्यक्ष आपल्या कर्मभूमी मध्ये काँग्रेस पक्षाचे काम करावे आणि काँग्रेसच्या एकसंघतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा जनतेची मने आणि हृदय जिंकण्याची ही संधी काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपण संघटितपणे काम करून येणाऱ्या निवडणुकात पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे कार्य करून दाखवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निवडीच्या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने कुणाल बागबंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नम्रपणे सांगितले की पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश शिरसावंद मान्य करून मी कार्य करत राहील यापूर्वीही प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे पुढेही कार्य करत राहील काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव अग्रेसिव राहील माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी मी प्रयत्न करीन वरिष्ठ नेत्यांना माझ्या कोणत्याही कृतीमुळे खाली मान घालावी लागेल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही असा विश्वासी त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कुणाल बागबंदे यांच्या या निवडीबद्दल काँग्रेस पक्षातील आणि युवक आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.