महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी कुणाल बागबंदे यांची नियुक्ती
उदगीर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासुन काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय काम करणारे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचे निकटवृत्तीय तथा उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल किरणकुमार बागबंदे यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करुन त्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना अधिक काम करण्यासाठी बळ दिले आहे.महाराष्ट्रातील युवक आघाडीच्या कर्तबगार आणि संघटन कुशल तरुणांना प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसच्या वतीने व्यूह रचना आखण्यात येत आहे. महाराष्ट्र विविध भागातील तरुणांच्या कार्याची दखल घेवुन क्रियाशील कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये उदगीर येथील तरुण कार्यकर्ते कुणाल किरण बागबंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसे अधिकृत पत्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी प्रदीप शिधवा, माधव सिंह, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रभारी प्रतिमा मुदगल, वंदना बैन इत्यादी मान्यवरांनी स्वाक्षरी करून दिले आहे.सदरील नियुक्ती पत्रामध्ये प्राधान्याने सचिव आणि सहसचिव यांच्या निवडी केल्या असून युवक काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये सहभागी झालेल्या या तरुणांनी आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पक्षाची ध्येयधोरणे आणि सर्वधर्मसमभावाची भावना यासोबतच एक संघपणे काँग्रेसचे नेते सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, आणि नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अलवारू राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी या कार्यकारिणीकडून अपेक्षा व्यक्त करून आपल्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त ताकतीने प्रत्यक्ष आप आपल्या भागा मध्ये काँग्रेस पक्षाचे काम करावे आणि काँग्रेसच्या एकसंघतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी दिलेली आहे. या निवडीच्या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने कुणाल बागबंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश शिरसावंद मान्य करून मी कार्य करत राहील यापूर्वीही प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे पुढेही कार्य करत राहील काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव अग्रेसर भुमिका घेणार असुन वरिष्ठांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न करीन वरिष्ठ नेत्यांना माझ्या कोणत्याही कृतीमुळे खाली मान घालावी लागेल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असुन एक नवी जबाबदारी..!!महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस ” सचिव ” म्हणुन नियुक्त केल्या बद्दल सर्व वरीष्ठ नेतृत्वाचे आभारी तसेच आमचे नेते माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब,सहकारमहर्षी श्री दिलीपराव देशमुख,माजी मंत्री मा. आ.श्री.अमीतभैय्या विलासराव देशमुख साहेब,माजीमंत्री मा.श्री बस्वराज पाटील मुरूमकर, मा.आ.श्री धीरजभैय्या देशमुख,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस श्री. राजेश्वरजी निटूरे साहेब आदींच्या स्नेहरुपी मार्गदर्शना मुळे हे शक्य झाले असून अखिल भारतीय युवक कॉंग्रेस प्रभारी कृष्णाजी अल्लवरु,भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी बी.व्ही.,युवक काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी मितेंद्र सिंग, प्रदीप सिंघवी जी , राष्ट्रीय सचिव तथा सह प्रभारी वंदनाजी बैन,युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा प्रमुख शरण पाटील मुरूमकर, उदगीरचे आमचे जेष्ठ मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, कृ.उ.बा. चे सभापती सिद्धेश्वरजी पाटील, लातूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयजी निटुरे, उदगीर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष कल्याणजी पाटील,शहराध्यक्ष मंजूर पठाण महिला सेल युवक काँग्रेस मागासवर्गीय सेल अल्पसंख्यांक सेल सोशल मीडिया सेल उदगीर तालुका च्या वतीने सर्वांचें मन:पुर्वक अभिनंदन व्यक्त केले आहेत.