नोकरीच्या मागे न लागता उद्योग धंद्याकडे वळा – माजी राज्यमंत्री आ. बनसोडे
उदगीर (एल. पी. उगिले) : युवा पिढीने आता शासकीय असेल किंवा खाजगी असेल नोकरीसाठी धावपळ करून आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया घालण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार नवीन नवीन उद्योग धंदे उभे करावेत. आणि आपण नोकरी देणारे बनावेत, अशी अपेक्षा माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील चौबाऱ्या जवळील “न्यू सना ज्वेलर्सच्या” उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार चवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष समद शेख, शहराध्यक्ष समीर शेख, माजी नगरसेवक शमशुद्दीन जरगर, जळकोट चे माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य उस्मान मोमीन, अविनाश रायचुरकर, इमरोज हाश्मी, शफी हाश्मी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, सोन्याचा व्यवसाय उत्कृष्ट आहे. मात्र त्यासाठी समाजामध्ये विश्वास संपादन करायला वेळ लागतो. त्यामुळे लगेच च्या लगेच व्यवसायाला गती येईल असा हा व्यवसाय नाही. त्यामुळे हाताश न होता, नव्या जोमाने कामाला लागावे, ज्या पद्धतीने चांगल्या डॉक्टरच्या हाताला गुण येतो. हे लक्षात आल्यानंतर समाजातील बहुतांश लोक त्याच डॉक्टर कडे जातात. तशाच पद्धतीने सोन्याचा व्यवसाय प्रामाणिकपणे केला जातोय, हा विश्वास समाजातील लोकांच्या मनावर बिंबवला गेल्यास, या सोन्याच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहत नाहीत. असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी बोलतांना व्यक्त केला.
याप्रसंगी अध्यक्ष समारोप करताना बसवराज पाटील नागरकर यांनी सय्यद माजिद पाशामिया, शफी हाश्मी आणि त्यांच्या परिवारातील सर्वांना या उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पटणे यांनी केले. तर न्यू सेना ज्वेलर्सचे सय्यद माजीद यांनी आभार व्यक्त केले.