प्रोफेसर डॉ. नरसिंग कदम यांची संत नामदेव काव्य पुरस्कारासाठी निवड

प्रोफेसर डॉ. नरसिंग कदम यांची संत नामदेव काव्य पुरस्कारासाठी निवड

उदगीर: येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कदम नरसिंग यांची निवड संत नामदेव काव्य साहित्य पुरस्कार 2022 करिता करण्यात आली आहे.

त्यांनी साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या गोंडर या कवितासंग्रहाच्या उत्कृष्ट निर्मिती बद्दल राष्ट्रीय पातळीवरील संत नामदेव काव्य साहित्य पुरस्कार 2022 जाहीर केल्याचे संयोजक शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी पत्र देऊन कळविले आहे . या पुरस्काराचे वितरण हे 22 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.

डॉ. नरसिंग कदम यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. यापूर्वी कदम यांना साहित्य लेखनाबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल अशा दोन क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सुप्रसिद्ध असा संत नामदेव काव्य साहित्य पुरस्कार 2022 त्यांना जाहीर करून सन्मानित केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील ,सचिव ज्ञानदेव झोडगे ,उपाध्यक्ष अशोकराव पाटील ,सर्व कार्यकारणी सदस्य शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पत्रकार बांधव, आप्तेष्ट व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांकडून त्यांचा सत्कार केला जात आहे.

About The Author