ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ नये
लातुर (प्रतिनिधी) : ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी घालण्यासाठी सरकारने कृषी खात्याकडून आवश्यक ती माहिती मागविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
ग्लायफोसेट मुळे कँसर होतो या समजुतीमुळे,बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. मात्र टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. राजेश दिक्षीत यांनी रसायनामुळे कँसर होतो, हे खरे नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच रसायनांच्या जास्त संपर्कामुळे लिंफोमा नामक कँसर होऊ शकतो,मात्र या कँसरचे प्रमाण भारतात सरासरीपेक्षा खुप कमी आहे. पंजाब आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तथाकथित कँसर साथीच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही ठिकाणी कँसरग्रस्त रुग्णांचे प्रमाण हे भारतातील सरासरी पेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी घालु नये अशी मागणी विभागीय कृषी सहसंचालक लातुर,जिल्हा कृषी अधिक्षक लातुर व कृषी विकास अधिकारी लातुर यांना शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
गावात पेरणीयोग्य ओल झाली की, सर्वांची पेरणीसाठी एकच घाई होते. एकाच वेळी पेरणी झाल्यामुळे पिकांची व तणांची उगवण एकाच वेळी होते. त्यामुळे तण काढण्यासाठी खुरपणी करण्याचीही वेळ एकच असते. म्हणुन पुरेसे मजुर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तण वेळेवर काढले जात नाही. पिकांमध्ये तण असल्यास ते पिकांचे अन्न व पाणी खाते व पिकांना कुपोषित करते. त्या बरोबरच पिकांमध्ये तण वाढल्याने तणांवर पिकांना अपायकारक किटकांची व रोगांची वाढ होते त्यामुळे किटकनाशकांचा खर्च वाढतो. व शेवटी तणांची वाढ होऊन त्यांच्या बिया शेतातच पडुन दुसऱ्या वर्षी अधीक तणांची उगवण होते. परिणामी पिकांचे नुकसान होते.
एकुण तणनाशक वापरले नाही, तर मानवी श्रमाने तण काढणे शक्य होनार नाही. म्हणून आता तणनाशक वापरणे अपरिहार्य झाले आहे.तणनाशकांच्या वापरामुळे पिकांमधील तणांचा वेळीच बंदोबस्त करणे सहज शक्य झाले आहे. तसेच रोग व किटकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे किटकनाशकांचा अनावश्यक खर्चाचा भार कमी झाला आहे.
ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी घातली तर शेतकऱ्यांना इतर तणनाशके वापरावे लागतील
ग्लायफोसेट हे तणनाशक इतर तणनाशकांपेक्षा सुरक्षित आहे. तरीही पर्यावरणवादी पर्यावरणाला घातक असलेल्या तणनाशकावर बंदीची मागणी करण्या ऐवजी शेतकऱ्यांना सोईचे असलेल्या ग्लायफोसेट तणनाशकावर बंदीची मागणी करीत आहेत, यावरुन त्यांचा हेतू लक्षात येतो.त्याची ही मागणी कदापि समर्थनीय नाही.
तसेच सरकारने ग्लायफोसेट तणनाशकावर बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी संघटने सोबत चर्चा करावी,शास्त्रीय दृष्ट्या प्रमाणीत, रास्त वैज्ञानिक कारणासाठी बंदी होनार असेल तर आमची मान्यता असेल. मात्र काही हितसंबंधी घटकांच्या दबावामुळे बंदीचा निर्णय होनार असेल तर त्या निर्णयाला शेतकरी संघटनेचा तिव्र विरोध असेल.
म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, जेष्ठ नेते दगडुसाहेब पडिले, तालुकाध्यक्ष, कालिदास भंडे, अशोक पाटील, हरिश्चंद्र सलगरे, विठ्ठल संपते, बालाजी जाधव, वसंत कंदगुळे, बाबाराव पाटील, आण्णाराव चव्हाण, केशव धनाडे, शिवाजी बिराजदार आदिंची उपस्थिती होती.