उदगीर ते कपिलधार पदयात्रा रवाना
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ते कपिलधार पदयात्रा शि.भ.प. उद्धव महाराज हैबतपुरे व शि.भ.प. शिवराज नावंदे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पदयात्रा कपिलधार कडे रवाना झाल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गुरु हवगीस्वामी मठाचे मठाधिश डाॅ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपाआशीर्वाद, शि.भ.प. उद्धव महाराज हैबतपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता नगर व कपाले गल्ली येथील शिवभक्तांची कपिलधार पदयात्रा नगरपरिषद व्यापारी संकुल महात्मा बसेश्वर पुतळा येथून प्रारंभ झाली. ही पदयात्रा हैबतपुर, तोंडार, हेर मार्गे अहमदपूर येथून निघणाऱ्या कपिलधार पदयात्रेत चाकूर येथे सहभागी झाली. तर शि.भ.प. शिवराज नावंदे गुरुजी व बसवराज बॅळे यांच्या नेतृत्वाखाली कपिलधार पदयात्रा श्री गुरु हावगीस्वामी मठ येथून मिरवणूकिणे शिवाजी चौक, उमा चौक मार्गे मन्मथ स्वामी मंदिर ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर येथे कोरे परिवाराच्या वतीने स्वागत करून रवाना झाली.
मिरवणुकीत श्री गुरु हावगी स्वामी मठाचे मठाधीश डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज हे सहभाग घेऊन यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. ही पदयात्रा तोंडार, सावंतवाडी, नळेगाव कारखाना ,भातखेडा, लातूर, हरंगुळ, जोडजवळा, तांदूळजा, धनेगाव ,गांजी, माळेचिंचोली, उत्तरेश्वर पिंपरी, नांदुर घाट, चाकरवाडी मार्गे सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र कपिलधार संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधी स्थळी या पदयात्रेचा सांगता समारोप होणार आहे.पदयात्रेकरुंना श्री गुरु हावगी स्वामी महिला भजनी मंडळ, नवश्या महादेव महिला भजनी मंडळ यांच्यासह नगरसेविका रेखाताई कानमंदे, सुशीलकुमार जेवणे, विरेंद्र प्रभुदेव स्वामी, राम मोतीपोळे यांनी शुभेच्छा दिल्या.