सरदार पटेल व इंदिरा गांधी यांचे राष्ट्र उभारणीत मोठे योगदान – शिवकुमार हसरगुंडे

सरदार पटेल व इंदिरा गांधी यांचे राष्ट्र उभारणीत मोठे योगदान - शिवकुमार हसरगुंडे

उदगीर (एल.पी.उगीले) : सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांचे राष्ट्र उभारणीत मोठे योगदानअसल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे यांनी केले.
उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे, डॉ. पी. एम. देवशेट्टे, डॉ. आर. व्ही. तानशेट्टे, कार्यालयीन अधिक्षक सुर्यकांत धनुरे, बालाजी सांडवे, नागनाथ केंद्रे, राम राठोड उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना हसरगुंडे यांनी, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी आहेत.
त्यांचा त्याग, संगठनकौशल्य, शिस्त, राष्ट्रप्रेम हे अतुलनीय असे होते. इंदिरा गांधी सोबत अत्यंत निस्वार्थपणे आपण कार्य केले आहे. त्यांच्याशी माझा पत्र व्यवहार होता. पंजाबचा प्रश्न त्यांनी अत्यंत बारकाईने हाताऴला. पाकिस्तान व बांगलादेशच्या विभाजनामध्ये महत्वाची भूमिका घेऊन जगाला आपल्या सामर्थ्याचा परिचय त्यांनी करुन दिला. त्यामुऴे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांचे योगदान राष्ट्रीय उभारणीत अतुलनीय असे होते, असे ते म्हणाले.
प्र.प्राचार्य डाॅ.एस.एन. शिंदे यांनी, सरदार पटेल हे लोहपुरुष आणि इंदिरा गांधी आर्यन लेडी होत्या. दोन्हीं कणखर व वास्तव प्रश्नाला उत्तर देणारे नेते होते. काऴाला समजून घेणाऱ्या या नेत्यांनी काऴाच्या पुढचा विचार करुन राष्ट्राला समृद्ध केले आहे. त्यामुऴे राष्ट्रीय एकता दिवस साजरा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. मनोहर भंडारे यांनी केले. आभार डाॅ. डी.आर. होनराव यांनी मानले.

About The Author