बंटी उर्फ धीरज कसबे यांची युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड

बंटी उर्फ धीरज कसबे यांची युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक आघाडी जास्तीत जास्त प्रभावशाली कार्यरत करण्यासाठी खांदेपालट केले जाते आहे. तसेच अनेक कार्यक्षम युवा कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर नियुक्ती देऊन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टीसमोर ठेवून सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उदगीर येथील धीरज उर्फ बंटी पांडुरंग कसबे यांची निवड उदगीर विधानसभा युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी करण्यात आल्याचे पत्र युवक काँग्रेसचे लातूर लोकसभा अध्यक्ष विजय राजेश्वर निटूरे यांनी दिले आहे.
सदरील पत्रात लातूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी पालकमंत्री आ. अमित भैया देशमुख, आ. धीरज भैया देशमुख, प्रदेश काँग्रेसचे नेते राजेश्वरजी निटूरे, कुणाल जी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व युवकांचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. आपली कार्यक्षमता विचारात घेऊन आपल्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आम्हाला आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले असून सदरील जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडाल. असा विश्वास व्यक्त केला आहे. धीरज उर्फ बंटी कसबे यांची निवड होताच, माजी पालकमंत्री आमदार अमित भैया देशमुख आणि प्रदेश काँग्रेसचे नेते राजेश्वरजी नीटुरे यांनी बंटी कसबे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना बंटी उर्फ धीरज कसबे यांनी स्पष्ट केले की,पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रामाणिक कार्य करू. आपले ज्येष्ठ नेते, पक्षश्रेष्ठी यांचा सन्मान वाढेल आणि संघटन बांधणी मध्ये आपले सहकार्य होईल. असा विश्वासही व्यक्त केला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!