लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर यांचा दशकपूर्ती सोहळा रक्तदान शिबिराने संपन्न

लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर यांचा दशकपूर्ती सोहळा रक्तदान शिबिराने संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : अर्थ संस्थेतील अग्रगणी लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर शाखा उदगीर यांच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
सदरील अर्थ संस्था फक्त आर्थिक घडामोडी मध्ये अग्रगणी नसून सामाजिक क्षेत्रातही या संस्थेतर्फे वेळोवेळी विविध उपक्रम साजरे केले जातात.
उदगीर शाखेच्या या रक्तदान शिबिरात तब्बल 71 रक्तदात्यांनी रक्तदान करून हा विशेष दिवस साजरा केला.
या रक्तदान शिबिराचे अध्यक्षस्थान भरत चामले यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ चंबुले माधव,डॉ सोनाळे नवनाथ,बाळासाहेब पाटोदे,राजकुमार मोगले,सतीश पाटील मानकीकर,युवराज कांडगिरे, उपस्थित होते.
सदरील संस्थेच्या सर्व शाखेत ही रक्तदान चळवळ राबवली गेली. या रक्तदान शिबिरात प्रदीप मुळे,आकाश बोडके,निळकंठ गोरे,घोगरे सुभाष,पवन गायकवाड,भांगे दिलीप,अमोल जाधव,विलास जाधव,संदीप नळगिरकर,मोहम्मद मुल्ला,सोमनाथ मंठोळे,धनराज तलवारे,विश्वास पडिले,लंबोटे नागनाथ,पुंडलिक पाटील,शार्दुल कुबडे,गणेश धोंगडे,दत्तात्रय सूर्यवंशी,उमेश सूर्यवंशी,किशोर बिरादार,जनार्दन भांगे,कदम श्रीराम,अंबादास श्रीमंगले,कुशल प्रजापती, केंद्रे,वाडकर अनिकेत,शेळके शिवम,भांगे इंद्रकुमार, संगम सुभाने,माधव केंद्रे,सुरनर अविनाश, विक्रम गुट्टे,मारुती दबडे,सचिन टिळे, सनी सकट,अजय सकट,रोहित कोटलवार,विरभद्र हुडगे,महेश पाटील,धनाजी कुंटे,माधव घंटाळे,मनोज किवंडे,डॉ नवनाथ सोनाळे,श्याम गिरी,अक्षय शिवशेट्टे,ओमकार तरवडे,माधव गुबाळे,नागेश शेटकार,गिरी मनोज, तस्लिम शेख,गोविंद हुडे,अजय कांबळे,सुशीलकुमार पांचाळ,विकास बोधले,सचिन पुरी,सुरेश कोळेकर,बालाजी फड,सतीश रेनके,इरफान पठाण, गजानन काळे,पटेल अली,सौ दुर्गा केंद्रे,रामदास डीगोळे,केंद्रे प्रवीण, पप्पू गायकवाड,अमन कांबळे,माधव केंद्रे,दबडे मारोती,अजय कुलकर्णी,राजवीर शेखावत,तुलसीदास सुडे,राहुल सुडे,अनिश वाघमारे यांनी रक्तदान केले.
सर्व पाहुण्यांचे व रक्तदात्यांचे आभार स्संस्थेचे जनरल मॅनेजर सांगवे भगवानराव यांनी मानले. तर शाखेच्या वतीने सर्व रक्तदान करणाऱ्या युवकांना मोफत एक लाख रुपयाचा विमा देत असल्याचे शाखा व्यवस्थापक माधव केंद्रे यांनी यावेळी घोषित केले.
सदरील शिबिराच्या यशस्वितेसाठी शाखेच्या वतीने शाह प्रसाद,केंद्रे प्रवीण,भांगे इंद्रकुमार,पटेल अली,कामशेट्टे माधुरी,संदीप रेनके व तसेच नागप्पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर च्या वतीने डॉ शेटकार बस्वराज,ओमकार गांजुरे,सचिन कोनाळे,सोमनाथ स्वामी,योगेश गोदाजी,सपना कांबळे,विनायक टकटवळे,अविनाश जयकर यांनी काम पाहिले.

About The Author