समाजहितासाठी सामाजिक समतेची ज्योत अशीच तेवत ठेवा – न्यायमूर्ती मरलापल्ले

समाजहितासाठी सामाजिक समतेची ज्योत अशीच तेवत ठेवा - न्यायमूर्ती मरलापल्ले

उदगीर (एल.पी.उगीले) : गुडसूरमधील समाज सुधारकांनी यापूर्वी समाजप्रबोधन व विविध चळवळी राबविल्याने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इ.चे ममतेचेव सामाजिक समतेचे विचार रूजले.
शिक्षणामुळे ज्ञानाचा उजेड मिळाला.
सामाजिक न्याय, बंधूभाव, समता हाच गुडसूरचा स्थायीभाव आहे.यापुढेही ही समतेची ज्योत तेवत ठेवण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती
बाबूराव मरलापल्ले यांनी आवाहन‌ केले.
माजी सरपंच विठ्ठलराव मरलापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली कै.बापूसाहेब काळदाते प्रतिष्ठाण व पद्मावती माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय तर्फे
संपन्न झालेल्या कार्यक्रमात गुडसूर मधील आदर्श परंपरांचा गौरवपूर्ण उल्लेख न्या.
मरलापल्ले यांनी केला.
व्यासपीठावर सेवानिवृत्त न्यायाधीश सुभाषराव मुडपे,क्रीडापटू प्रा.चंद्रपाल दडिमे,
ज्येष्ठ शिक्षक बाबूराव मुस्कावाड, डॉ.
रंगनाथ गुडसूरकर, राष्टृपती पुरस्कार प्राप्त
विश्वनाथ मुडपे,अर्जूनराव नवाडे इ.मान्यवर
विराजमान झाले होते.
तत्पूर्वी कै.बापूसाहेब काळदाते प्रतिष्ठानतर्फे
पाच लाख रू.खर्चून दलित बांधवांसाठी
बांधण्यात आलेल्या “डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनचे” प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा
उद्घाटक बाबूराव मरलापल्ले यांच्या हस्ते
भवनचे लोकार्पण झाले.यानंतर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे भवन
बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नामदेवराव गोमारे, सूत्र संचालन माधव देमगुंडे तर केंद्रे गुरूजींनी उपस्थितांचे आभार मानले.
कै.राजपाल बंडे सभागृहात संस्था सचिव
विनोबाजी पाटील यांनी
विविध क्षेत्रातील मान्यवर रामचंद्र मरलापल्ले, विठ्ठलराव दवणे,मेहताब शेख
राजाराम बिरादार, गुंडेराव यांचा यथोचित सत्कार केला.

About The Author