पन्नास वर्षांपासून वस्ती आहे,अतिक्रमण म्हणून मतदार संघातील एकही घर पडणार नाही : आमदार संजय बनसोडे

पन्नास वर्षांपासून वस्ती आहे,अतिक्रमण म्हणून मतदार संघातील एकही घर पडणार नाही : आमदार संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : मतदार संघातील व मुख्य म्हणजे शहरातील अशोक नगर, फुले नगर, गांधी नगर, मुसा नगर, तोंडार पाटी व मादलापूरसह आदी भागातील नागरिकांना प्रशासनाने आपले घर अतिक्रमणात असल्याची नोटीस दिली आहे. मात्र एकाचेही घर पडणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावु नये. मी कायम आपल्या सोबत खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास उदगीर – जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी समाजबांधवांना दिला.
ते उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित समाज बांधवांच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, शशिकांत बनसोडे, दयानंद शिंदे, संजय काळे, पिंटु सुतार, जितेंद्र शिंदे, पप्पु गायकवाड, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्लकुमार उदगिरकर, किशाबाई कांबळे,सतिश कांबळे, आदीसह समाजबांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी,
मागील काही दिवसापूर्वीच आपल्या शहरातील काही भागांमध्ये शासकीय गायरान जमीनीवर अतिक्रमण झाल्या बाबत व ते काढण्यासाठी शासन व प्रशासनाने येथील नागरीकांना नोटीसा बजावुन त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न हे सत्तेत असणारे सरकार करत आहे. काही भागातील नागरिकांना नोटिसा बजावल्या असल्याचे मला कळल्यापासून मी विविध भागातील समाज बांधवांकडून त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. त्या संदर्भातच आपल्या सोबत बैठक घेऊन चर्चा करत असून आपल्या मतदारसंघातील किंवा शहरातील कुणाचेही घर पडणार नाही, याची जबाबदारी माझी आहे.
त्यासोबतच आपले संरक्षण करण्याची शपथ मी आमदार झाल्यावर घेतली आहे. मात्र राजकीय सुडबुद्धिपोटी हा सगळा खटाटोप चालू असून यामध्ये माझ्या एकाही नागरिकांचे घर पडू नये. म्हणून मी स्वतः प्रशासनाला विनंती केली आहे. ज्या भागात नागरिक सद्या राहत आहेत, तेथे मागील स्वातंत्र्य पूर्व काळापासुन हे नागरीक या वस्तीमध्ये राहत असुन याचाही विचार शासन व प्रशासनाने करावा. असे सांगून जर शासन मुद्दाम कठोर भुमिका घेत असेल तर गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर चालवत असाल तर सर्वांत पहिले आपण या भागाचा आमदार म्हणून मी त्या बुलडोजर समोर उभा राहीन, अशी ग्वाही आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थित नागरिकांना व समाजबांधवांना दिला.
उदगीर मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असून मी या भागाचा आमदार केवळ आपल्या एकजुटीमुळे झालो असून आपल्या प्रत्येक सुख दुःखात मी येत आहे. मात्र प्रशासनाने माझ्याच मागासवर्गीय नागरिकांच्या घरावर अतिक्रमणाच्या नावाखाली बुलडोझर लावणार असतील तर ते मी सहन करणार नाही. सर्वात अगोदर आपल्या न्याय हक्कासाठी मी स्वतः लढणार असून आपण आपल्या घरासंबंधी कुठलीही काळजी करू नये. मी आपल्या सोबत खंबीर उभा आहे, आणि सदैव राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनाही घरे पाडु नये. या संदर्भात सुचना केल्या आहेत.

About The Author