मातृभूमी महाविद्यालयात पदवी प्रमाणपञ वितरण सोहळा संपन्न, शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करा – प्राचार्या उषा कुलकर्णी
उदगीर (एल.पी.उगीले) : प्राप्त केलेली पदवी व ज्ञानाचा उपयोग स्वत: बरोबरच समाजहित व समाज विकासासाठी व्हावा. असे प्रतिपादन प्राचार्या उषा कुलकर्णी यांनी केले. त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मातृभूमी महाविद्यालय आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे दिलीप पाटील सहायक कुलसचिव,स्वा.रा.ती.म., विद्यापीठ, गोरख दिवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उदगीर . महारुद्र गालट शहर अभियान व्यवस्थापक,न.प.उदगीर,संजय राठोड सदस्य मातृभूमी प्रतिष्ठान, प्रा. उस्ताद सय्यद परिक्षा प्रमुख मातृभूमी महाविद्यालय , कोमल घुळे ( विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी) आदींची उपस्थित होती.
पुढे बोलतांना प्राचार्या कुलकर्णी म्हणाल्या की, पदवी व शिक्षणाचा उपयोग सामाजिक जानिवेतून व्हावा , शिक्षणामुळे सामाजिक समस्य ,पर्यावरण संवर्धन , याविषयीही जागरुकता बाळगावे. रॅली व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी दिलीप पाटील यांनी मातृभूमी महाविद्यालयाच्या नियोजनबद्ध कामाचे व महाविद्यालयातील विद्यार्थ्यींना मिळत असलेल्या यशाचे विशेष कौतुक केले.
गोरख दिवे यांनी कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि आई वडिलांच्या कष्टाला जागा असा अनमोल संदेश विद्यार्थ्यांना दिला. महारूद्र गालट यांनी उदगीर क्षेत्रातील सामाजिक उपक्रम, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण या उपक्रमात मातृभूमी महाविद्यालय नेहमीच सक्रिय सहभाग घेते याबद्दल महाविद्यालयाचे नगरपरिषद वतीने विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले सुत्रसंचालन प्रा. सौ. अश्विनी देशमुख यांनी केले. तर आभार प्रा. रुपाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष जोशी , प्रा. रणजित मोरे,प्रा. धोंडीराम जोशी,प्रा. आशा पवार, प्रा. रेखा रणक्षेत्रे,प्रा. अन्वेष हिप्पळगावकर, उषा सताळकर ,ओंकारे जगदीशा , कांचन कडपत्रे, संतोष जोशी ,नंदकिशोर बयास ,दयानंद टाके, विवेक देवर्षे यांनी प्रयत्न केले. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थी ,पालक तसेच मातृभूमी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.