सामाजिक बंधुभाव ही तर संत साहित्याची शिकवण – आ. संजय बनसोडे

सामाजिक बंधुभाव ही तर संत साहित्याची शिकवण - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ही संताची पावन भुमी आहे. या पावन नगरीत विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहेत आपल्या पुढच्या पिढीमध्ये वारकरी सांप्रदायामुळेच चांगले संस्कार येत असुन संत साहित्याची पूजा न करता त्याचे आचरण करावे कारण सामाजिक बंधुभाव ही तर संत साहित्याची शिकवण आहे असे मत माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर येथील वारकरी साहित्य परिषदेच्या ११ व्या वर्धापण दिनानिमित्त आयोजीत एक दिवसीय अखिल भारतीय मराठी संत साहित्य संम्मेलन व विठ्ठल पुरस्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. एकनाथ महाराज हंडे, माजी आ.गोविंदराव केंद्रे, जिल्हा बंँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, प्रा.श्याम डावळे, रमेश अंबरखाने,ह.भ.प. श्रीधर धुमाळ, पुंडलिक महाराज मृगजळे,भानुदास महाराज शंकर महाराज येदले, दगडुआप्पा कोरे, वसंतराव कदिरे, नामदेव महाराज श्रीशैल्य, कापडे गुरुजी, माधव पवार महाराज, नानासाहेब क्षीरसागर, भागवत महाराज लोहारकर, निवृत्ती महाराज पंढरपूरकर, भागवत महाराज चांदेगावकर, ह.भ.प. अलकाताई महाराज,ह.भ.प. दैवशालाबाई केवळराम, ह.भ.प. मुक्ताताई दळवे, ह.भ.प. जयाताई मोरे उदगीरकर, ह.भ.प.लोचनाताई महाराज, ह.भ.प.कमलताई बिराजदार, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, वारक-यांच्या प्रश्नासाठी मी मंत्री असताना मंत्रालयात बैठक लावुन त्यांच्या अडचणी समजुन घेवुन वारकरी सांप्रदायाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती, असे सांगुन भविष्यातही मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. आपली मागणी वारकरी भवनाची आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

वारकरी सांप्रदायाच्या प्रश्नावर भविष्यात मी विधानसभेत आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ते केवळ तुमच्या जीवावर, त्यामुळे तुमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. मागील कोरोनाच्या काळात उदगीर येथील रोटी कपडा बँकेचे कार्य कौतुकास्पद असून कोरोना काळात अनेकांचे अंत्यविधी त्या – त्या जातीधर्मानुसार करुन सामाजिक बांधिलकी ठेवण्याचे काम या सर्व रोटी बँकेच्या पदाधिका-यांनी केले आहे. रोटी कपडा बँकेच्या पदाधिकाऱ्यांचे काम पाहुन अभिमान वाटतो. असे गौरोव्दागार आ.बनसोडे यांनी काढले.

कोणी हिंदु नाही, कोणी मुस्लिम नाही, मानवता हा एकच धर्म आहे. त्यामुळे सर्वांनी बंधुभावाप्रमाणे रहिल्याने आपला सामजिक एकोपा वाढतो. कुठल्याही भुल थापांना बळी न पडता आपण जे काम करतो, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, अशी सादही त्यांनी यावेळी घातली. याप्रसंगी ह.भ.प.रामराव भोसले महाराज .भ.प.राजकुमार निवंते महाराज, ह.भ.प. विश्वजीत पाटील, ह.भ.प.योगेश मोरतळे महाराज, ह.भ.प.नरसिंग कापडे महाराज, ह.भ.प.संतोष येणकीकर महाराज, श्रीनिवास बिरादार, चंद्रलेखा गुंडरे, नरसिंग महाराज, हिराताई सागावे, चंद्रकला लटपटे, मीनाताई मामडगे, सुरेश पाटील नेत्रगावकर, प्रशांत मांगुळकर, वाकुडे, आशिष अंबरखाने, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष महाराज नाईक यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. सिद्धेश्वर लांडगे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विश्वजीत पाटील, रामराव भोसले व इतर सदस्यांनी केले होते. रोटी कपडा बँकेचे सदस्य, व्यापारी गणेश मंडळाचे सदस्यासह संयोजक या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरीक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author