कु.प्रतिक्षा गुडाप्पे यांचा सत्कार

कु.प्रतिक्षा गुडाप्पे यांचा सत्कार

अतनूर (एल.पी.उगीले) : जळकोट पोलीस स्टेशन अंतर्गत अतनूर भाग बीटचे जमादार श्रीधर गंगाधर गुडाप्पे यांची मुलगी कु.प्रतिक्षा श्रीधर गुडाप्पे हिने सन २०२२ च्या Neet-UG परिक्षेत ५७१ गुण घेवून प्राविण्य मिळविले असून तिची स्वामी रामानंद तिर्थ शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाईसाठी पहिल्या यादीत निवड झाली आहे. याबद्दल अतनूर येथे शनिवारी रोजी वसुंधरा महिला मंडळ व जिजामाता महिला मंडळ अतनूर, जळकोट नगरपंचायतचे पहिले नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रथम नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग, मुंबई पोलीस भागाचे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त गणेश रेकुळवाड गव्हाणकर, अतनूर बीटचे जमादार श्रीधर गुडाप्पे, मित्रमंडळाचे अध्यक्ष दिलीप सोनकांबळे, मित्रमंडळाचे सदस्य बालाजी तिडके, गंगा देवासी, माधव मोरे, बालाजी शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या सचिव सौ.संध्या शिंदे, जिजामाता महिला मंडळ अतनुरच्या अध्यक्षा सौ.शोभा शिंदे, सचिव श्रीमती शकुंतला बाबर, सौ.मीना गुडाप्पे उपस्थित होते.
यावेळी तिचा शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सत्कार करीत भावीकाळात गोरगरिबांसाठी समाजसेवावृत्ती बाळगुन सेवेत लवकरच रूजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अनेकांनी अभिनंदनाचा वर्षांव केला. यावेळी ती सत्काराला उत्तर देताना म्हणाली की, तिला घडविण्यात तिची आई सौ.मिना श्रीधर गुडाप्पे व शिक्षकवृंद यांचा मोलाचा वाटा आहे. वडीलांचे पोलीस दलातील निस्पृह, निस्वार्थी, निष्कलंक सर्वसामान्य जनतेला सेवावृत्तीने सेवा देत असल्यामुळे मला हे यश मिळाल्याचे ही तिने सांगितले.

About The Author

error: Content is protected !!