जाणापूर येथे दुसरे फेस्टिव्हल उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : जाणापूर (शि.) येथे दिवाळी सुट्टीचे औचित्य साधून मागील वर्ष 2021 पासून जाणापूर फेस्टिव्हल भरवले जात आहे.तर या वर्षी फेस्टिव्हलचे दुसरे वर्ष होते.हे फेस्टिव्हल दोन दिवस भरविण्यात आले.
पहिल्या दिवशी सकाळी ठीक 10 :00 वाजता आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.जगातील सर्वश्रेष्ठ दान ,जीवन दान म्हणजे रक्तदान होय.यावेळी रक्तदानाचे महत्व जाणून 10 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आणि आरोग्य तपासणी करण्यात आली.वृक्षांचे महत्व जाणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तर पहिल्या दिवशी संध्याकाळी गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली व ‘जगायचं तर असं ‘ हे प्रबोधनपर एकपात्री नाटक सादर करण्यात आले. तसेच कृतवान भूमीपुत्रांचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी विविध गुण दर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमात परिसरातील बालकलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यात गाणी,नाटिका सादर करण्यात आली. याचा ग्रामस्थांनी मनमुराद आनंद लुटला. या फेस्टिव्हल च्या दोन्ही दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तर ७५ वर्षावरील जेष्ट नागरिकांना आधाराची काठी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यामुळे लहानशा खेडेगावात ग्रामीण भागात फेस्टिव्हल आयोजित करण्यात आल्याने सणानिमित्त परगावी नोकरी,व्यवसायानिमित्त राहणारी मंडळी गावी आले होते.त्यांनाही या निमित्ताने एकमेकांना भेटता आले.भेटीगाठी झाल्या अतिशय महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.मा.बसवराज पाटील नागराळकर यांनी खेडेगावात होणारे माझ्या पाहण्यातील पाहिले फेस्टिव्हल असून गावात एकोपा राखा ,गावातून आपल्या कृतत्वावर मोठे झालेल्या बांधवांनी जन्मभूमीला आणि आई – वडिलांना विसरू नका असे सांगितले. तर मा.आमदार सुधाकर भालेराव यांनी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.गावातून या कार्यक्रमास उदंड असा प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिराचे उदघाटन बसवराज पाटील कौळखेडकर,रमेश अण्णा आंबरखाने,चंद्रकांत पाटील कौळखेडकर ,रामेश्वर निटूरे,राजकुमार बिरादार सरपंच बामणी, यांनी केले तर प्रा.महादेव बनसोडे हे होते.ग्रामसेवक भरत आरणे,डॉ.व्यंकटेश वट्टमवार, डॉ.विजय बिरादार,डॉ.प्रशांत नवटक्के,खंडोमलके सर,डॉ.नाटककार जोतिबा भदाडेआदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.तर रक्तदान सुनील जाधव,हणमंत सेलूकर,शशिकांत खंडोमलके,ओमकार बिरादार,प्रा.माधव बनसोडे,अभिषेक अडकुटे, अमोल बोईवाडे,मधुकर अडकुटे,सचिन अडकुटे केले.संध्याकाळी वक्तृत्व स्पर्धा व गीतगायन स्पर्धा नाटिका यावेळी राजेश्वर निटूरे,बसवराज पाटील कौळखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच संतोष राठोड, विनायक आडे, चिट्टे सावकार,मन्मथ कोंडमारे,रतीलकांत आंबेसंगे,कैलास पाटील,पांडुरंग पाटील,गोरख नागठाणे,बाळासाहेब सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सुधाकर भालेराव,चंद्रकांत अण्णा वैजापूरे,शिवानंद हैबतपुरे,अमोल निडवडे,प्रा.पटणे, बालाजी गवारे,धनराज बिरादार,साईनाथ चिमेगावे,साहेबराव पाटील,सरपंच मीनाक्षी कल्याणराव बिरादार,उपसरपंच गुणवंतराव बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन कल्याणराव बिरादार,शाम राठोड(गुरुजी), तानाजी बनसोडे,गोरख नागठाणे,संतोष मुळे, अमोल बिरादार,भगवान कांबळे,वसंत जाधव,मच्छिंद्र अडकुटे ,विराप्पा वडमुरगे,तानाजी राठोड, मारोती चव्हाण,महालिंग कन्नाडे, शिवाजी पाटील,मारोती पाटील,निलावती जाधव,रमेश खंडोमलके आदी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख नागठाणे,शाम राठोड(गुरुजी) यांनी केले तर आभार कल्याणराव बिरादार यांनी मानले.