स्त्रियांना समानतेच्या वागणुकीचे संस्कार कुटुंबातूनच रुजायला हवेत – डॉ.अंजली जोशी

स्त्रियांना समानतेच्या वागणुकीचे संस्कार कुटुंबातूनच रुजायला हवेत - डॉ.अंजली जोशी

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद विधी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कौटुंबिक हिंसाचार: सद्यस्थिती या विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी साधन व्यक्ती डॉ. अंजली जोशी प्राध्यापक, दयानंद कला महाविद्यालय लातूर ह्या होत्या. त्यांनी आपल्या वेबिनार मधून स्त्री-पुरुष समानता, रूढी परंपरेनुसार स्त्रियांना नाकारलेले अधिकार, सध्याची वास्तविक स्थिती, कौटुंबिक हिंसाचाराची कारणे, लॉक डॉउन मध्ये वाढता कौटुंबिक हिंसाचार, विविध शासकीय योजना, स्त्रियांप्रती असलेले संरक्षण विषयक कायदे या सर्व गोष्टींची उहापोह केला. स्त्रियांना त्यांचे नैतिक अधिकार व आर्थिक पाठबळ दिले तर स्त्रिया प्रगतीचा कुठलाही टप्पा यशस्वीपणे पार पाडू शकतात असेही यावेळी त्यांनी म्हटले. यावेळी दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ. पुनम नाथानी, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ एस ए महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक काटेकर यु. यु.यांनी केले.

About The Author