कोरेगाववाडी येथे पाचवीतील विद्यार्थिनीचा आत्महत्या
(उमरगा) : तालुक्यातील कोरेगाववाडी शिवारात शेतात असलेल्या घरात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीने आईने चहा न दिल्याने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि९) घडली. इतक्या लहान वयाच्या मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्यासारखा दुर्दैवी निर्णय घेतल्याने आश्चर्य व हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबतची माहीती अशी की तालुक्यातील कोरेगाववाडी येथील रहिवाशी असलेल्या शानेदिवाण कुटूंबीयाचे शिवारात लक्ष्मी पाटीच्या जवळ वीटभट्टी आहे.
सर्व कुटुंब शेतातच घर करून वास्तव्यास आहेत . शहरातील आदर्श विद्यालयात इ पाचवीत शिकणारी आयडॉल जाकिर शानदिवाण (वय १२ ) ही घरात होती.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास आई शेतात काम करून घरी आल्यानंतर आयूलने आईला चहा करून द्यायला सांगितले . तेव्हा आईने शेतातून आत्ताच येऊन टेकले आहे,थोडे थांब चहापासून देते असे म्हटल्यानंतर रागाने आयूलने खोलीला आतून कडी लावून गळफास घेतला. अशी प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. ही दुर्दैवी घटना समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला आणि तातडीने खाजगी रूग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टराने तपासून मृत घोषित केले.रात्री उशिरा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.