स्वातंञ्यवीर बिरसा मुंडा यांचा स्वातंञ्यासाठीचा लढा मोलाचा – प्राचार्य उषा कुलकर्णी

स्वातंञ्यवीर बिरसा मुंडा यांचा स्वातंञ्यासाठीचा लढा मोलाचा - प्राचार्य उषा कुलकर्णी

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्यातील योगदान मोलाचे असून समाजाचे संघटन करून इंग्रजाविरोधात आवाज उठवत 1897 ते 1900 च्या दरम्यान बिरसा मुंडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले, व इंग्रजांना सळोकीपळो करून सोडत, 1898 मध्ये इंग्रजांना पराभूत केले. तत्पूर्वी 1994 मध्ये तरुण क्रांतिकारी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांनी लावलेल्या “लगान” विरोधात आवाज उठवला, त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. व त्यांना दोन वर्षाची शिक्षाही झाली. त्यामुळे बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोलाचे असल्याचे मत प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

त्या मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या, कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसां मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन कररण्यात आले. यांयावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा . बिभीषण मद्देवाड, प्रा. रेखाला रनक्षत्रे ग्रंथपाल उषा ताळकर, जगदीशा ओंकारे, प्रा. रूपाली कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य कुलकर्णी म्हणाल्या की, बिरसा मुंडा यांचे कार्य बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये होते. आदिवासी बांधवांसाठी त्यांचे योगदान मोलाचे होते. इंग्रजाच्या विरोधात लढा दिला. व देशाला स्वातंत्र्य करण्यासाठीचे व आदिवासींचे जीवनमान व त्यांचा हक्क मिळून देण्यासाठी बिरसा मुंडा यांचे योगदान महत्त्वाचे होते .त्यामुळे बिहार, ओडीसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या क्षेत्रामध्ये बिरसा मुंडा यांना पूजले जाते .यावेळी मातृभूमी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author