इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवात शिवाजीच्या मनोज झुंगाला दोन पारितोषिके

इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवात शिवाजीच्या मनोज झुंगाला दोन पारितोषिके

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी मनोज झुंगा याची निवड महाविद्यालयीन स्तरावरून विद्यापीठ स्तरावरील संघामध्ये झालेली होती.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ राहुरी येथे १८ व्या इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय युवक महोत्सवात सहभागी झाला होता .त्यामध्ये शिवाजी महाविद्यालयाच्या मनोज झुंगा याला लोकसंगीत वाद्यवृंद या कला प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळाले .याने या संघामध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली व या संघाने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर विडंबन या कला प्रकारामध्ये तृतीय पारितोषिक मिळवून कास्य पदक प्राप्त केले आहे. या यशाबद्दल त्याचा महाविद्यालयाच्या वतीने किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेव चामले ,प्राचार्य डॉ.विनायक जाधव, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रो.डॉ. नरसिंग कदम, प्रबंधक बी के पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. या विद्यार्थ्याला मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा माने प्रशांत, प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी केले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About The Author