सीमा सुरक्षा दलामध्ये निवड,सत्यम कापडेचा डॉक्टरांनी केला सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : अडीच लाख तरुणांमधून सत्यम कापडे याची सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाल्याबद्दल येथील स्पंदन हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या वतीने सत्कार करण्यात आला . केंद्र शासनाच्या गृह विभाग अंतर्गत येणाऱ्या बी एस एफ अर्थात सीमा सुरक्षा दल मध्ये पहिल्याच प्रयत्नात सत्यम किशन कापडे याची निवड झाली आहे . सत्यम हा बी एस सी च्या शेवटच्या वर्षाला आहे . पदवी पूर्ण होण्यापूर्वीच कोनाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वतः मेहनत घेवून नौकरी मिळवणारा तरुण आज अनेकांचा मार्गदर्शक ठरत आहे.
स्पंदन हॉस्पिटल येथे सत्यम कापडे याच्या निवडीबद्दल त्याचा सामान्य रुग्णालयाचे डॉ कालिदास बिरादार , स्पंदन हॉस्पिटलचे डॉ सुनील माने , डॉ . मन्मथ सोनाळे यांनी पालकांसह सत्कार केला . यावेळी शहाजी पाटील शिरोळकर , दत्तू कापडे ,विशाल महापुरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
सत्यम कापडे याच्या यशात त्याचे वडील किशन कापडे आणि आई याच्या संस्काराचा मोलाचा वाटा आहे . मोबाईल आणि सोशल मीडिया पासून दूर राहण्याचा संयम कुटुंबाने बाळगला, म्हणून किशन कापडे यांचा मोठा मुलगा शुभम हा दुबई येथे फार्मा कंपनीत सहाय्यक जनरल मॅनेजर पदावर आणि सत्यम हा सीमा सुरक्षा दल मध्ये निवडला गेला आहे . योग्य रित्या प्रयत्न केले तर पदवी पूर्ण होण्यापूर्वीच नौकरी लागू शकते. हे कापडे कुटुंबातील दोन्ही मुलांनी सिद्ध करून दाखविल्याचे सामान्य रुग्णालयाचे डॉ कालिदास बिरादार यांनी सांगितले.
आजच्या तरुणांनी सोशल मीडिया आणि राजकीय घडामोडींवर वाद विवादात वेळ वाया न घालविता, आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे यश हमखास मिळते .असे डॉ सुनील माने यांनी सांगितले.
पदवीचे शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धा परीक्षेची तयारी सातत्यपूर्ण केली तर स्पर्धेत लाखो तरुण असेल तरीही यश मिळविणे सहज शक्य असल्याचे सत्यम कापडे याने दाखवून दिले आहे. असे डॉ मन्मथ सोनाळे यांनी सांगितले . सत्यम कापडे आणि त्याचे वडील किशन कापडे आणि आई शकुंतला कापडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .