मारहाण करून मोटरसायकल व मोबाईल पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपीला मुद्देमालासह नांदेड मधून अटक

मारहाण करून मोटरसायकल व मोबाईल पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपीला मुद्देमालासह नांदेड मधून अटक

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारीचा संदर्भात नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने उत्कृष्ट पद्धतीने तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या माल आणि चोरांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, गेली दोन महिन्यापूर्वी अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीत एका मोटार सायकल स्वारास कळवून त्याचे डोळ्यात मिरची पूड घालून मारहाण करून मोटर सायकल व मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली होती.त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 539/2022 कलम 394,34 भा द वि (गंभीर दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर)जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती, दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून नमूद गुन्ह्यातील आरोपी नांदेड जिल्ह्यातील राहणारा असल्याने सदरचा पथक तात्काळ नांदेड येथे पोहोचले. तेथे पोहोचून स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील संशयित आरोपींना नामे कमलाकर उर्फ सोनू प्रकाश सोनसळे, (वय 26 वर्ष, राहणार भीमघाट, वजीराबाद, नांदेड) यास त्याच्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने काही दिवसापूर्वी लातूर शहरात एका मोटारसायकल स्वारास मारहाण करून, डोळ्यात मिरची पूड घालून त्याची मोटरसायकल व मोबाईल असा मुद्देमाल आणखीन एक साथीदार नामे मुस्ताक अली (वय 22 वर्ष ,राहणार उत्तर प्रदेश) अशा दोघांनी मिळून जबरीने लुटली आहे, असे कबूल करून गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकल व मोबाईल काढून दिले.

त्यावरून नमूद आरोपीस मुद्देमालसह नांदेड मधून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोलीस ठाणे एमआयडीसी येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलीस करत आहेत.गुन्हयातील दुसरा आरोपी मुस्ताक अली फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, राजू मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांनी केली आहे.

About The Author