रोटरीचे जगभर कोविड संकटकाळात उल्लेखनीय कार्य – प्रांतपाल रो. हरीश मोटवानी
अहमदपूर (गोविंद काळे) : जग कोविड संकटाचा सामना करत असताना कोविड काळात जगभरात व भारतात रोटरी क्लबने उल्लेखनिय कार्य केले असल्याचे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रोटेरियन हरीश मोटवानी यांनी रोटरी क्लब अहमदपूरला भेट दिली यावेळी केले. भारतात कोविड काळात रोटरी क्लबने अनेक शहरात सेंटर उभा केले याचा फायदा हजारो रुग्णांना झाला. अहमदनगर येथील कोविड सेंटरमध्ये तर अनेक रुग्ण दाखल झाले व दुरुस्त होऊन सुखरुप घरी परतले. डिस्ट्रिक्ट ३१३२ने जवळपास 60 रोटरी क्लबना ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक रुग्ण क्रिटिकल स्टेजमध्ये जाण्यापासून वाचू शकले. काही क्लबने रुग्णांना जेवणाचे डबे, कोविड काळात गरजूंना अन्नधान्य वाटप असे भारतभर कार्यक्रम घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी रोटेरियन नजीब पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल रोटेरियन हरीश मोटवानी सह प्रांतपाल रोटेरियन रामप्रसाद राठी व सचिव रोटेरियन प्राध्यापक शिव शंकर पाटील हे होते. यावेळी रोटरी क्लब अहमदपुर चे अध्यक्षनदी पठाण यांनी आपल्या कार्याचा वार्षिक अहवाल मांडला ऑक्सीजन मशीन चा उपयोग तालुक्यातील रुग्णांना झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात कोविड योद्धे म्हणून डॉक्टर मधुसूदन चेरेकर, डॉक्टर वैभव रेड्डी, डॉक्टर नीलेश मजगे यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात नूतन सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन कपिल बिरादार यांनी केले तर आभार क्लबचे सचिव प्राध्यापक शिवशंकर पाटील यांनी मांडले.
या कार्यक्रमास रोटेरियन शरद जोशी, प्रा द .मा.माने, नरसिंग चिलकावार माधव वलसे, डॉक्टर वैभव रेड्डी, डॉक्टर मधुसूदन चेरेकर, मोहिब कादरी, भरत ईगे , ज्ञानोबा भोसले, गोपाल पटेल, संतोष मद्देवाड, संजय गोटमवाड, अनिल फुलारी, बालाजी पटवारी, धनंजय कोत्तावार, श्रीधर लोहारे, प्रशांत घाटोळ, आशिष हेंगणे, धीरज ढेले, राहुल घाटोळ, कमलाकर सुडे, मनोज आरदवाड, अनिल चवळे, सर्व रोटेरियन बंधू-भगिनी उपस्थित होते.