संत ज्ञानेश्वर विद्यालयात संजीवन समाधी सोहळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी जि. प. सदस्य अशोक काका केंद्रे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अँड भारत चामे, विमलाबाई देशमुख कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदाताई कुलकर्णी ,प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा ह.भ.प. हरिदास तमेवार गुरुजी, भाजपाचे तालुकाध्यक्ष हणमंत देवकत्ते,पं.स. माझी उपसभापती बालाजी गुट्टे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बबलू पठाण, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना गणेश दादा हाके म्हणाले की जगामध्ये ज्ञानेश्वरी हा अनमोल ग्रंथ असून त्याचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आपल्याला संस्कार व अध्यात्म समजणार नाही म्हणून संत साहित्याचा अभ्यास करावा. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ह. भ. प. हरिदास तम्मेवार यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन केले. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी सभापती एडवोकेट भारत चामे यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी सूत्रसंचलन शारदा तिरुके यांनी तर आभार मीनाक्षी तौर यांनी मानले. प्रारंभी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ठीक दुपारी बारा वाजता गुलाल उधळून माऊलीची आरती करण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी पसायदान म्हणून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.