आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटनेचा विविध मागण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
अहमदपूर (गोविंद काळे) : आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, कष्टकरी संघटना, महाराष्ट्र भारतीय किसान सभा, सहारा मित्र मंडळ, व शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक व शहरातील विविध मागण्या संदर्भात दिनांक २१ नोव्हेंबर रोजी शहरातील निजवंतीनगर, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिनालॉज मार्गे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन दाखल करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेला. उपलब्ध ओळीवर रब्बी पेरण्या उरकल्या, काही ठिकाणी पेरणीचे काम चालू आहे. परंतु पेरलेले बी उगवण्यासाठी पाणी देणे अत्यावश्यक असताना महावितरण उपविभागामार्फत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे. यामुळे अगोदरच कर्जाच्या ओजाखाली दबलेल्या शेतकरी आर्थिक बाजूने यंगला असून पेरलेले बियाणे पाण्याअभावी नाचते की काय? या विवंचनेत सापडला आहे. करिता महावितरण ने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडू नये, अहमदपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतीचे वीज बिल माफ करावे, अहमदपूर शहरात शौचालय व मुतारीची सोय करावी, सन २०१९ ते २२ या वर्षात ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान जाहीर केले असताना ५५ टक्क्यांनी वाटप चालू आहे. हे अनुदान 80% ने वाटप व्हावे, गाव तेथे सार्वजनिक स्मशानभूमी योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, शहरात नवीन पाईपलाईन करून पंधरा ते वीस दिवसाला पाणीपुरवठा होत आहे तो पाणीपुरवठा दरारोज व्हावा, चालू हंगामासाठीचा पिक विमा तात्काळ वितरित करावा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्यात यावे, अहमदपूर शहरात होणाऱ्या चोऱ्यांचा बंदोबस्त करावा व पोलीस बंदोबस्त वाढवावा, मर शिवनी येथील भटक्या विमुक्त समाजाला कबालनामे देऊन त्यांना घरकुल देण्यात यावे, येथील तहसील कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या स्थानिक व तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, मुद्रांक शुल्क खात्याने तहसील कार्यालयास पाठविलेले प्रलंबित फेरफार तातडीने मंजूर करावेत या व आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनावर राजू पाटील, प्रताप भोसले, प्राध्यापक नाना कदम, मनोहर पाटील, सुधाकर चोले,अण्णाराव सूर्यवंशी, बाबुराव जंगापल्ले, दत्ता वरवटे, मौलाना बिलालसाब, भारद्वार हनुमंत बालाजी भुरे विठ्ठल पोले, शिवाजी भुरे, उद्धव कोकाटे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटनेचा विविध मागण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा.
अहमदपूर:-( गोविंद काळे )आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, कष्टकरी संघटना, महाराष्ट्र भारतीय किसान सभा, सहारा मित्र मंडळ, व शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक व शहरातील विविध मागण्या संदर्भात दिनांक २१ नोव्हेंबर रोजी शहरातील निजवंतीनगर, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिनालॉज मार्गे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन दाखल करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेला. उपलब्ध ओळीवर रब्बी पेरण्या उरकल्या, काही ठिकाणी पेरणीचे काम चालू आहे. परंतु पेरलेले बी उगवण्यासाठी पाणी देणे अत्यावश्यक असताना महावितरण उपविभागामार्फत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे. यामुळे अगोदरच कर्जाच्या ओजाखाली दबलेल्या शेतकरी आर्थिक बाजूने यंगला असून पेरलेले बियाणे पाण्याअभावी नाचते की काय? या विवंचनेत सापडला आहे. करिता महावितरण ने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडू नये, अहमदपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतीचे वीज बिल माफ करावे, अहमदपूर शहरात शौचालय व मुतारीची सोय करावी, सन २०१९ ते २२ या वर्षात ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान जाहीर केले असताना ५५ टक्क्यांनी वाटप चालू आहे. हे अनुदान 80% ने वाटप व्हावे, गाव तेथे सार्वजनिक स्मशानभूमी योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, शहरात नवीन पाईपलाईन करून पंधरा ते वीस दिवसाला पाणीपुरवठा होत आहे तो पाणीपुरवठा दरारोज व्हावा, चालू हंगामासाठीचा पिक विमा तात्काळ वितरित करावा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्यात यावे, अहमदपूर शहरात होणाऱ्या चोऱ्यांचा बंदोबस्त करावा व पोलीस बंदोबस्त वाढवावा, मर शिवनी येथील भटक्या विमुक्त समाजाला कबालनामे देऊन त्यांना घरकुल देण्यात यावे, येथील तहसील कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या स्थानिक व तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, मुद्रांक शुल्क खात्याने तहसील कार्यालयास पाठविलेले प्रलंबित फेरफार तातडीने मंजूर करावेत या व आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनावर राजू पाटील, प्रताप भोसले, प्राध्यापक नाना कदम, मनोहर पाटील, सुधाकर चोले,अण्णाराव सूर्यवंशी, बाबुराव जंगापल्ले, दत्ता वरवटे, मौलाना बिलालसाब, भारद्वार हनुमंत बालाजी भुरे विठ्ठल पोले, शिवाजी भुरे, उद्धव कोकाटे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.