तीन गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आरोपीस औरंगाबाद मधून अटक

तीन गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आरोपीस औरंगाबाद मधून अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
लातूर/एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने लावला आहे. सदरील आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे सदरील आरोपीकडून तीन गुन्हे उघड झाले असून इतरही गुन्ह्याच्या संदर्भात माहिती मिळू शकते अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मध्ये पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे सन 2021 मध्ये दाखल असलेल्या मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यात आरोपी रामाचारी बिस्कुट पवारला अटक करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मालमत्ता चोरी गुन्ह्यात तो पाहिजे होता. रामाचारी पवार अटकेमध्ये असताना गांधीचौक पोलीस ठाण्याच्या लॉकअप मधून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. परंतु तो मिळून येत नव्हता. लॉकअप मधून पळून गेल्याने त्याच्यावर पोलीस ठाणे गांधीचौक येथे पोलीस कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन नमूद फरार आरोपीस ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक बनवून त्यांना मार्गदर्शन व सूचना करून नमूद फरार आरोपीला ताब्यात घेण्याकरिता प्रयत्न करण्यात येत होते.

नमूद फरार आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीवरून दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी सदरचे पथक औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन या ठिकाणी पोहोचून बिडकीन गावातील रामनगर परिसरातील आरोपीच्या चुलत सासऱ्याच्या घरातून रामाचारी पवार यास ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपी नामे रामाचारी उर्फ राजवीर बिस्कुट उर्फ भीमंना उर्फ शंकर पवार(, वय 22 वर्ष, राहणार कवठारोड, वसमत जिल्हा हिंगोली. हल्ली मुक्काम बिडकीन जिल्हा औरंगाबाद)याचेवर लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 245/2021 कलम 224 भादवी., पोलीस ठाणे विवेकानंद चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 56/2021 कलम 379 भादवी., पोलीस ठाणे विवेकानंद चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 248/2021 कलम 379 भादवी., पोलीस ठाणे औसा गुन्हा रजिस्टर क्रमांक 32/2021, कलम 454, 457, 380 भादवी., पोलीस ठाणे औसा, गुन्हा रजिस्टर क्रमांक 77/2021 कलम 457, 380 भादवि., पोलीस ठाणे भादा, गुन्हा रजिस्टर क्रमांक 28/2021 कलम 379 भादवि.प्रमाणे गुन्हे दाखल असून तो सदरच्या गुन्ह्यात पाहिजे होता. रामाचारी बिस्कुट पवार यास पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे गांधीचौक यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पोलीस पथकातील सपोनी सचिन द्रोणाचार्य, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, जमीर शेख , नकुल पाटील यांनी पार पाडली आहे.

About The Author