शिवाजी महाविद्यालयात शरीर शोष्ट स्पर्धा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा च्या “ब ” झोन शरीर शोष्ट best physique अंतर महाविद्यालयीन स्पर्धा उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती . सदर स्पर्धेत “ब ” विभागीय परिक्षेत्रातील उदगीर, देवणी, अहमदपूर, चाकूर, कंधार, घोन्सी, अशी एकूण 9 महाविद्यालयाच्या 65 खेळाडूंनी विविध वजन गटात भाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव झोडगे ज्ञानदेव, विशाल पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विनायक जाधव, हे होते.मान्यवरांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून खेळाडूंना मार्गदर्शन केले व युवकांकडून चांगल्या शरीर शौष्टीची निरोगी शरीर राखण्यास सुचविले, खेळाडूंनी खेळाकडे जास्त प्रमाणात सहभाग करून आपले कौशल्याचे उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण करावे असे ते म्हणाले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण उपप्रचार्य प्रा. आर एम मांजरे यांच्या हस्ते विविध वजन गटातून प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना मेडल व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कौषाध्यक्ष चामले नामदेव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जी. जी. सूर्यवंशी शिक्षक वृंद, खेळाडू व कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा विभागाचे संचालक प्रा. नेहाल अहेमद , प्रा. गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.