महिला सबलीकरणाची सुरुवात प्रत्येक आईपासून व्हायला हवी – डॉ. मीनाक्षी नांदापूरकर

महिला सबलीकरणाची सुरुवात प्रत्येक आईपासून व्हायला हवी - डॉ. मीनाक्षी नांदापूरकर

अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था ही महत्वाची मानली जाते आणि त्या कुटुंबाचा खर्‍या अर्थाने आधार आई आहे. या स्त्रीचा सन्मान प्रत्येक घरात होणे आवश्यक आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या हक्कासाठी लढणे आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने आई पासून महिला सबलीकरणाची सुरुवात होईल असे मत हैदराबाद येथील विवेकवर्धनी महाविद्यालयाच्या डॉ.मीनाक्षी नांदापूरकर यांनी व्यक्त केले .
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाच्या वतीने आभासी तथा दूरदृश्य प्रणाली (ऑनलाइन ) च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘महिला सशक्तीकरण वास्तव आणि अपेक्षा ‘ या विषयावर समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या विषय तज्ज्ञ म्हणून डॉ.मीनाक्षी नांदापूरकर बोलत होत्या . या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी आदर्श विद्यार्थी सौ .माधवी चौकटे (औरंगाबाद) ह्या होत्या. तर उद्घाटक म्हणून वरंगल येथील सात वाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इक्बाल अली हे होते . तर विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. अनुपमा अलवाईकर , डॉ. मीनाक्षी नांदापूरकर,( हैदराबाद )सुप्रसिद्ध लेखिका डॉ. ललिता गादगे, डॉ.माधवी कवी (पुणे)आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शोध पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात पुढे बोलताना डॉ. मीनाक्षी नांदापूरकर म्हणाल्या की, स्त्रियांचा सर्वांगीण विकास तेव्हाच होईल ज्यावेळी त्यांना आत्मसन्मानाची वागणूक मिळेल तरच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल असेही ते म्हणाल्या .

यावेळी डॉ. अनुपमा अलवाईकर, डॉ. ललिता गादगे, डॉ. माधवी कवी आदींनी वेगवेगळ्या सत्रामध्ये तर या राष्ट्रीय चर्चा सत्राच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना स्त्री महिमा विशद केली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप सौ .माधवी चौकटे यांनी केला .

चौकट
‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्त महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात विषय तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी नांदापूरकर यांचे मत या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले.तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी मानले. तंत्र सहाय्य डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचीन गर्जे व ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले. या राष्ट्रीय चर्चासत्रात देशातील विविध भागातून बहुसंख्य अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author