राज्य तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या संघाची पुन्हा दादागिरी

राज्य तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या संघाची पुन्हा दादागिरी

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन व फेंसिंग असोसिएशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 वर्षीय राज्यस्तरीय कॅडेट तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील मुलीच्या संघाने ईप्पी या खेळ प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली .त्यामध्ये माही अरदवाड,जानवी जाधव, दिव्यांका कदम, वैभवी माने यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ईप्पी वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये माही अरदवाड हिने (सुवर्णपदक) जानवी जाधव हिने (रौप्य पदक) वैभवी माने हिने (कांस्य) प्राप्त केले आहे. या तीनही मुलींची महाराष्ट्राच्या संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संघात चार पैकी तीन खेळाडू हे लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील मुलींच्या संघाने सेबर या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदकांची कमाई केली .त्यामध्ये माही अरदवाड, दिव्यांका कदम, सोनाली गायकवाड, आदिती चवळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेमध्ये *प्रथम चॅम्पियनशिप मिळून लातूर जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त पदक प्राप्त करणारा जिल्हा ठरला आहे. मुलांच्या ईप्पी या संघाने सुद्धा कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यामध्ये साईप्रसाद जंगवाड, हर्षवर्धन सोमवंशी, कृष्णा कश्यप, आशिष लोखंडे या चारी खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवले. या स्पर्धेत एकूण लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी पाच सुवर्ण, पाच रौप्य, पाच कांस्य पदके प्राप्त केले आहेत . त्यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले यांच्यासह प्रशिक्षक वझरोद्दीन काजी, मोहसीन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अभिजीत मोरे, अहिल्यादेवी विद्यालयाचे मु.अ. प्रशांत माने व सर्व स्तरातून नागरिक त्यांचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!